टीनएजर्ससाठी इलेक्ट्रिक स्कूटर; driving license ची गरज नाही

Hover
Hovergoogle
Updated on

भारतातील वाहन मार्केटमध्ये सध्या सर्वात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वेगाने वाढत आहे. अनेक लहान-मोठ्या वाहन निर्मीती कंपन्या सध्या इलेक्ट्रीक वाहने बाजारात घेऊन येत आहेत. या क्षेत्रात अनेक स्टार्टअप कंपन्या देखील त्यांची वाहने लॉंच करत आहेत. दरम्यान एक नवीन इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनी कोरिट इलेक्ट्रिक (Corrit Electric) ने 12 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी एक विशेष इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस ही कंपनी होव्हर (Hover) नावाने एक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे.

Corrit Electric कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही इलेक्ट्रिक स्कूटर टप्प्याटप्प्याने लाँच केली जाईल, ज्यामध्ये ती आधी दिल्लीत लाँच केली जाईल आणि नंतर ती मुंबई, बंगळुरू आणि पुणे या सारख्या शहरांमध्ये लाँच केली जाईल. कॉरिट हॉवर या स्कूटरची किंमत 74,999 रुपये असेल आणि सुरुवातीच्या ग्राहकांना ती 69,999 रुपयांमध्ये मिळेल. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून 1,100 रुपयांमध्ये ही स्कूटर प्री-बुक करू शकतात. नोव्हेंबरपासून त्याची डिलिव्हरी सुरू होईल असा कंपनीचा दावा आहे. ही स्कूटर लाल, पिवळा, गुलाबी, जांभळा, निळा आणि काळा रंगाच्या ऑप्शन्समध्ये लॉन्च केली जाईल. या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीसाठी फायनांस सुविधा लीज ऑप्शन देखील उपलब्ध असेल.

Hover
आधार कार्ड आता स्वतःलाच करता येईल अपडेट, ही आहे सोपी प्रोसेस

कंपनीच्या दाव्यानुसार 12 ते 18 वयोगटातील तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून Hover डिझाईन करण्यात आली आहे, त्यामुळे त्याचे एक फीचर म्हणजे गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसेन्सची आवश्यक नाही. तसेच गोवा, जयपूर सारख्या शहरांमध्ये पर्यटकांना याचा वापर करता येईल. ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नसल्यामुळे या त्याचा टॉप स्पीड मर्यादित करण्यात आली आहे. हॉवरचा टॉप स्पीड 25 kmph आहे.

Hover सुमारे 250 किलो वजन सहज उचलू शकतो. त्याचे खास फीचर म्हणजे त्याचे जाड टायर, जे ट्यूबलेस आहेत आणि त्यामध्ये डिस्क ब्रेक्स देखील देण्यात आले आहेत, तसेच यात डबल शॉक ऑब्झर्व्हर्स देखील मिळतील.

Hover
MG Astor भारतात लाँच, किंमत Hyundai Creta पेक्षा कमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.