इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles) मागणी देशभरात दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच वाहन निर्माते ईव्ही गाड्यांकडे जास्त लक्ष देत आहेत आणि ग्राहकांसाठी बाजारात एकापेक्षा जास्त आधुनिक फीचर्स असलेल्या अनेक इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत. जर तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेण्याचा विचार करत असाल तर आपण आज 5 ई-स्कूटर्सबद्दल जाणून घेणार आहोत जे स्टायलिश तर आहेतच सोबत सिंगल चार्जमध्ये दमदार रेंज देखील देतात.
1- सिंपल वन
किंमत- 1.09 लाख रुपये
रेंज - 236 किमी
चार्जिंग टाइम- 3 तास
बेंगळुरू येथील सिंपल एनर्जीचे सिंपल वन नुकतेच लाँच करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला 4.8kWh बॅटरी मिळते जी ओला स्कूटरच्या बॅटरीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. मोड E मध्ये वापरल्यास एका चार्ज मध्ये स्कूटर 236 किमी धावते आणि त्याची किंमत 1.09 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
2- कोमाकी व्हेनिस
किंमत- 1,15,000 लाख रुपये
रेंज- 130 किमी
चार्जिंग टाइम - 3-4 तास
व्हेनिस ही एक स्टायलिश स्कूटर आहे जी चांगला पॉवर परफॉर्मन्स आणि आरामदायी राइड अनुभव देते. यामध्ये 3kW मोटर, 2.9kWh बॅटरी सह येते आणि 9 Poppy कलर्समध्ये बाजारात लॉन्च केले गेले आहे. . कोमाकीने स्लीक डिझाइन आणि एडव्हांस स्कूटर म्हणून लॉंच केले आहे, ज्यामध्ये सेल्फ डायग्नोसिस सिस्टिम, मोबाइल चार्जिंग पॉइंट, रिव्हर्स असिस्ट, एडिशनल स्टोरेज बॉक्स आणि फूल बॉडी गार्ड हे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.
3- ओला इलेक्ट्रिक S1 आणि S1 प्रो
OLA इलेक्ट्रिकने आपल्या पहिल्या स्कूटरचे दोन व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. OLA इलेक्ट्रिक S1 आणि S1 Pro या स्कूटर 15 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात आल्या होत्या. S1 ची किंमत 99,999 रुपये आहे, तर OLA S1 Pro ची किंमत 1,21,999 रुपये आहे. इलेक्ट्रिक स्कूटर 750W पोर्टेबल चार्जरसह येते, ज्याचा टॉप स्पीड 115 kmph आहे. ही स्कूटर अवघ्या तीन सेकंदात 40 किमी/ताशी वेग पकडू शकते. यामध्ये 2.9kWh बॅटरी आहे जी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सहा तास घेते.
4- Ather 450X
रेंड - 116 किमी
Ather 450X हे मागील मॉडेल Ather 450 ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे, जी 6kW PMSM मोटर आणि नवीन 2.9 kWh लिथियम-आयन बॅटरीसह येते. कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्जमध्ये हे स्कूटर 116 किमी धावते. फास्ट चार्जिंगसह ते 10 मिनिटांत 15 किमी चालण्यासाठी चार्ज होते. याशिवाय यात चार राइडिंग मोड्सही दिले आहेत.
Ather 450X आणि 450 Plus ची किंमत संबंधित राज्य सरकारने दिलेल्या अनुदानाच्या रकमेवर अवलंबून असते. Ather 450X आणि 450 Plus ची एक्स-शोरूम किंमत (सबसिडी वगळून) बहुतेक राज्यांमध्ये सुमारे 1.70 लाख रुपये आहे. Ather 450X मध्ये इतर फीचर्ससह येतो ज्याची किंमत 19,010 रुपये आहे.
5- हिरो इलेक्ट्रिक फोटॉन
रेंज - 108 किमी
हिरोची इलेक्ट्रिक फोटॉन स्कूटर भारतीय बाजारपेठेत दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये 72 LI आणि LP यांचा समावेश आहे. त्याच्या 72 LI व्हेरिएंटची किंमत 61,866 रुपये आणि LP व्हेरिएंटची किंमत 72,990 रुपये आहे. दुसरीकडे, जर आपण त्याच्या रेंजबद्दल बोलायचे झाले तर हीरोची ही स्कूटर एका चार्जवर 108 प्रति किलोमीटर धावते. तर पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.