best Fitness Apps: गेल्या काही वर्षात लोकं आरोग्याबाबत जागृक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शारिरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्याबाबत देखील लोकांमध्ये जागृकता दिसून येते. भारतातील अनेकजण लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब अशा समस्यांनी ग्रस्त आहेत. अशावेळी व्यायाम करणे फायद्याचे ठरते.
अनेकांना जिमला जाण्याचा कंटाळा येतो. तुम्ही देखील अशाच लोकांपैकी असाल तर प्ले स्टोरवर अनेक चांगले अॅप्स उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही घरीच व्यायाम करू शकता. अशाच काही शानदार फिटनेस अॅप्सविषयी जाणून घेऊया.
नींद (Neend)
Neend हे एक रिलॅक्स, स्लीप आणि मेडिटेशन अॅप आहे. या अॅपच्या संस्थापक सुरभी जैन या आहेत. कोव्हिडच्या काळात झोप येत नसल्याची तक्रार अनेकांनी केली होती. या अॅपमध्ये गोष्टी, स्मूथ स्लीप साउंड, मेडिटेशन स्थानिक भाषेत उपलब्ध आहेत. याच्या मदतीने सहज झोप लागेल. या अॅपला हजारो लोकांनी डाउनलोड केले आहे.
हेही वाचा: Auto Expo 2023: इलेक्ट्रिक कार्स मार्केट गाजवणार, बाजारात येणार 'या' ५ भन्नाट EV
BunkerFit-Strong Body & Mind
BunkerFit-Strong Body & Mind अॅप खास कर्मचाऱ्यांसाठी आहे. कर्मचाऱ्यांची अॅक्टिव्ह लाइफस्टाइल लक्षात घेऊन या अॅपला तयार करण्यात आले आहे. यामध्ये ट्रेनिंग वर्कआउट, योगा वर्कआउट, स्लीप मॉड्यूल, ब्रीदिंग एक्सरसाइज सारख्या अॅक्टिव्हिटी मिळतील. गुगल प्ले स्टोरवर मोफत उपलब्ध असलेल्या या अॅपला लाखो यूजर्सने डाउनलोड केले आहे.
Dance Workout for Weight Loss
या अॅपच्या मदतीने डान्स, एअरोबिक डान्स वर्कआउट, बेली डान्स शिकता येईल. याशिवाय, डान्स शिकताना तुमचे वजन देखील कमी होईल. गुगल प्ले स्टोरवर या अॅपला ४.१ रेटिंग मिळाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.