Jio Recharge Plan: जिओचा 500 रुपयांखालील बेस्ट रिचार्ज प्लॅन; मिळतो अमर्यादित कॉलिंगसह डेटा

best jio recharge plan under 500 rupees with daily data and unlimited calling
best jio recharge plan under 500 rupees with daily data and unlimited calling google
Updated on

Jio Recharge Plan: रिलायन्स जिओच्या ग्राहकांकडे सध्या रिचार्ज प्लॅन्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामुळेच कधी कधी यापैकी चांगला प्लॅन निवडणे कठीण होते. यातच जर तुम्हाला स्वस्त रिचार्ज प्लॅन हवा असल्यास ग्राहकांकडे तुलनेने कमी पर्याय शिल्लक राहतात. जर तुम्हाला दीर्घ वैधतेसाठी रिचार्ज करायचे नसेल आणि 500 ​​रुपयांपेक्षा स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर आज आपण काही विषेश प्लॅन्सबद्दल जाणून घेणार आहोत. हा प्लॅन सुमारे एक महिन्याच्या वैधतेसह येतो आणि दैनंदिन डेटासह अमर्यादित कॉलिंगसारखे फायदे ऑफर करतो.

सर्वाधिक पसंत केला जाणारा जिओ प्रीपेड प्लॅन

रिलायन्स जिओने ऑफर केलेला 299 रुपयांचा प्लॅन हा 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत येणारा सर्वोत्तम प्लॅन आहे. या प्लॅनसह रिचार्ज केल्यावर, ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळतो आणि हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. म्हणजेच रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 56GB डेटा दिला जातो.

best jio recharge plan under 500 rupees with daily data and unlimited calling
Apple Mobile : IPhone 13 मिळणार स्वस्त! ‘अशी’ आहे ऑफर

दैनंदिन डेटा व्यतिरिक्त, दररोज 100 एसएमएस देखील विनामूल्य उपलब्ध आहेत. याशिवाय Jio मेंबर्सना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud अॅप्सचाही एक्सेस मिळतो. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर, स्पीड 64kbps पर्यंत घसरते. कंपनीच्या मते, हा सर्वाधिक मागणी असलेला स्वस्त प्लॅन आहे.

best jio recharge plan under 500 rupees with daily data and unlimited calling
प्रकल्प गुजरातलाच का? राज ठाकरेंच्या प्रश्नाला शेलारांचं उत्तर; म्हणाले, परिपक्व राजकारणी...

इतर कंपन्या 299 रुपयांचारिचार्ज पर्याय देखील ऑफर करतात . भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) द्वारे 299 रुपयांची प्रीपेड प्लॅन देखील ऑफर केली जात आहे. तथापि, या दोन्ही कंपन्या 2GB ऐवजी 1.5GB दैनिक डेटा देतात. इतर फायद्यांबद्दल बोलायचे तर, अमर्यादित कॉलिंग व्यतिरिक्त, या प्लॅन्समध्ये दररोज एसएमएससारखे फायदे देखील मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.