कार खरेदी करत असताना भारतीय बाजारात अनेक गाड्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्ही बजेटमध्ये बसेल अशी मध्यम आकाराची SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये चांगले मायलेज असणे खूप महत्त्वाचे ठरते. आज आपण चांगले मायलेज देणाऱ्या काही एसयूव्ही कार्सचे बाजाराच उपलब्ध असलेले ऑप्शन्स जाणून घेणार आहोत.
KIA SONET
Kia Motors ची SUV KIA SONET ही देखील तुम्हाला चांगले मायलेज देते. यामध्ये तुम्हाला पेट्रोल इंजिन मिळते जे 18.4 kmpl आणि डिझेल इंजिन 24.1 kmpl मायलेज देते. तुम्ही Kia Sonet SUV 6,89,000 ते 12,29,000 च्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करू शकता.
ह्युंदाई व्हेन्यू
अधिक मायलेजसह देणारी मध्यम आकाराची SUV असलेली Hyundai व्हेन्यू ही कार देखील चांगला ऑप्शन आहे. तुम्हाला पेट्रोल इंजिनमध्ये 17.52-18.2 kmpl आणि डिझेल इंजिनमध्ये 23.4 kmph मायलेज मिळते. त्याची एक्स-शोरूम किंमत 6,99,200 ते 11,79,900 रुपयांच्या दरम्यान आहे.
टाटा नेक्सॉन
Tata Nexon SUV ही तुमच्या बजेटमध्ये बसेल अशी आणि चांगले मायलेज देणारी SUV आहे. यामध्ये पेट्रोल इंजिन कारचे मायलेज 17 किलोमीटर प्रति लिटर आणि डिझेल इंजिन कारचे मायलेज 21.5 किलोमीटर प्रति लिटर मिळते. Tata Nexon ची एक्स-शोरूम किंमत 7.29 लाख ते 13.3 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
Honda WR-V
Honda Cars ची SUV Honda WR-V ही देखील बेस्ट मायलेज देणारी SUV आहे. यामध्ये जर तुम्ही पेट्रोल इंजिनची कार खरेदी केली तर तिचे मायलेज 16.5 किलोमीटर प्रति लीटर असेल आणि डिझेल इंजिन खरेदी केल्यास ते 23.7 किलोमीटर प्रति लिटर माययलेज मिळते. या कारची एक्स-शोरूम किंमत 8.76 - 11.79 लाख रुपये आहे.
फोर्ड इकोस्पोर्ट
फोर्ड मोटरची एसयूव्ही इकोस्पोर्टमध्येही तुम्हाला चांगले मायलेज मिळते. जर तुम्ही ही SUV पेट्रोल इंजिनमध्ये घेतली तर मायलेज 15.9 kmpl आणि डिझेलमध्ये 20.9 kmpl असेल. या SUV ची किंमत ही 8,19,000 रुपयांपासून सुरु होते. हा देखील तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरु शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.