MPV
MPVSakal

Year Ender 2022: Ertiga ते Innova... वर्षातील 'या' आहेत बेस्ट सेलिंग ७ सीटर कार, किंमत ६ लाखांपासून सुरू

गेल्याकाही वर्षात भारतीय बाजारात SUV आणि MPV ची लोकप्रियता वाढली आहे. बाजारात १० लाखांच्या बजेटमध्ये येणाऱ्या अनेक चांगल्या कार्स उपलब्ध आहेत.
Published on

Best MPVs in India 2022: गेल्याकाही वर्षात भारतीय बाजारात SUV आणि MPV ची लोकप्रियता वाढली आहे. कंपन्या देखील भारतीय बाजारात कमी किंमतीत येणाऱ्या शानदार SUV आणि MPV लाँच करत आहे. ६-७ प्रवाशी सहज बसू शकत असल्याने MPVs ला बाजारात चांगली मागणी आहे. तुम्ही देखील नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर २०२२ मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या ५ एमपीव्ही कारबद्दल जाणून घ्या.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

Maruti Suzuki Ertiga
Maruti Suzuki Ertiga Sakal

Maruti Suzuki Ertiga

Maruti Suzuki Ertiga ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या MPV पैकी एक आहे. वर्षभरात या कारच्या तब्बल १,२१,५४१ यूनिट्सची विक्री झाली आहे. कामध्ये १.५ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, हे ५-स्पीड एमटी आणि ६-स्पीड एटीसह येते. कारची किंमत ८.३५ लाख रुपये ते १२.७९ लाख रुपये आहे.

Kia Carens

Kia Carens ही वर्षातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या MPV च्या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. जानेवारीत लाँच झाल्यापासून कारच्या ५९,५६१ यूनिट्सची विक्री झाली आहे. यामध्ये १.५ लीटर पेट्रोल, १.४ लीटर टर्बो पेट्रोल आणि १.५ लीटर डिझेल इंजिनचा पर्याय मिळतो. एमपीव्हीची किंमत १० लाख रुपये ते १८ लाख रुपयांपर्यंत आहे.

MPV
Christmas Gifts: जोडीदारासाठी बना सिक्रेट सांता, गिफ्ट द्या 'हे' हटके गॅजेट्स; पाहा लिस्ट
Toyota Innova HyCross
Toyota Innova HyCrossSakal

Toyota Innova HyCross

एमपीव्ही सेगमेंटमध्ये Innova च्या गाड्यांना नेहमीच पसंती मिळतो. कारच्या ५६,५३३ यूनिट्सची आतापर्यंत विक्री झाली आहे. याशिवाय, कंपनीने Innova Crysta ला देखील डिझेल इंजिनसह सादर केले आहे. तर HyCross केवळ पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे.

Maruti Suzuki XL6

Maruti Suzuki XL6 भारतातील सर्वात लोकप्रिय प्रीमियम ६ सीटर कार आहे. २०२२ मध्ये या कारच्या २५ हजारांपेक्षा अधिक यूनिट्सची विक्री झाली आहे. यामध्ये १.५ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या गाडीची किंमत ११.२९ लाख रुपये ते १४.५५ लाख रुपयांपर्यंत आहे.

Renault Triber

Renault Triber या लिस्टमध्ये ५व्या क्रमांकावर आहे. यावर्षात कारच्या ३१,७५१ यूनिट्सटी विक्री झालीये. यात १.० लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, जे ५ स्पीड एमटी आणि एएमटीसह येते. ट्रायबरची एक्स-शोरूम किंमत ५.९२ लाख ते ८.५१ लाख रुपये आहे.

MPV
FIFA World Cup मध्ये Google चाही 'गोल', २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()