Best Off Road Bikes : Bike Riding साठी वेडे आहात? या आहेत बेस्ट बाईक्स!

विकेंडला बाईक सुस्साट पळवायची मजाच काही और असते
Best Off Road Bikes
Best Off Road Bikesesakal
Updated on

Best Off Road Bikes : काही लोक विक ऑफची वाट उत्सुकतेने पाहत असतात. आरामसाठी नव्हे तर ग्रुपसोबत  बाईक राईडला जाण्यासाठी. विक ऑफ, लाँग विकेंड आणि सुट्ट्या गाठून स्पोर्ट बाईक घेऊन डोंगरमाथे पालथे घालणाऱ्यांचे अनेक ग्रुप आहेत. तुम्हालाही असेच वेड असेल तर या काही खास बाईक्स तुमच्यासाठी आहेत.

जर तुम्हाला ऑफ-रोडिंगची आवड असेल आणि तुम्ही बेस्ट स्पोर्ट्स बाईक शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आम्ही तुम्हाला देशातील सर्वात लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक आणि तिच्या किमतींबद्दल सांगणार आहात.

Best Off Road Bikes
Upcoming Bikes : होंडा पासून बजाजपर्यंत, या महिन्यात लाँच होणार एकसो एक बाइक्स

जर तुम्ही लडाखमध्ये फिरण्याचा विचार करत असाल. आणि तुम्हाला ही बाइक ट्रिप पूर्ण करायची असेल, तर Hero Puls आणि Royal Enfield Himalay या दोन्ही बाईक्स तुमच्यासाठी बेस्ट असतील.

धडकी भरवणारा आवाज, दमदार इंजिन, स्टाइलिश लूक यांसह अनेक कारणांसाठी अतिशय लोकप्रिय ठरलेल्या आणि तरुणाईच्या गळ्यातील ताइत झालेल्या Royal Enfield ने आपली नवीन Himalayan बाइक भारतीय बाजारात लॉन्च केली आहे.

रॉयल एनफिल्ड हिमालय 411 सीसी, सिंगल-सिलेंडर, एअर/ऑइल-कूल्ड इंजिन वापरते. या अॅडव्हेंचर बाइकची ऑन रोड किंमत सुमारे 2 लाख 54 हजार रुपये आहे.

हे पूर्ण कलर TFT इन्स्ट्रुमेंट डिस्प्लेसह सुसज्ज आहे. जे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि पर्यायी टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह येते. KTM ने ट्रॅक्शन कंट्रोल (TC) पॅनेल सुरू केले आहे. ज्यात आता दोन मोड आहेत. ऑन रोड  आणि ऑफ रोड. ऑन-रोड किमतीबद्दल बोलायचे झाले तर, या बाईकची किंमत सुमारे 4 लाख रुपये असेल.

 

Best Off Road Bikes
Bike Riding Tips : नव्याने बाईक चालवायला शिकलात? या गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर...

KTM 390 Adventure

KTM साहसी मोटरसायकल 248cc, लिक्विड-कूल्ड इंजिनसह येते, जी 29.5 Bhp आणि 24N पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. त्याच वेळी, त्याचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. म्हणजे यात यांत्रिक पद्धतीने चालवलेला स्लीप आणि असिस्ट क्लच देण्यात आला आहे.

या बाइकमध्ये दोन नवीन कलर शेड्स देण्यात आले आहेत. यामध्ये KTM फॅक्टरी रेसिंग ब्लू आणि डार्क गॅल्व्हानो ब्लॅक या रंगांचा समावेश आहे.

अपडेटेड केटीएम ३९० अॅडव्हेंचर बाइकमध्ये नवीन कास्ट अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. यात पॉवरसाठी ३७३.२ सीसी सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड, डीओएचसी इंजिन आहे.

हे इंजिन ४३ hp ची पॉवर आणि ३७ Nm पीक टॉर्क जनरेट करते. जो खडबडीत रस्त्यांवर थकवा न येता अतिशय आरामदायी राइडचा अनुभव देतो. त्याची ऑन रोड किंमत सुमारे 2 लाख 81 हजार रुपये आहे.

Best Off Road Bikes
Bike Celebration : गावातल्या पहिल्या स्कूटीची ग्रँड एंट्री; बँडबाजा, गुलाल उधळून जंगी स्वागत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.