Tata Nexon : टाटा मोटर्स ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार निर्मिती करणारी कंपनी आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकी आणि ह्युंदाई अजून कायम आहे. तर टाटा मोटर्सची सर्वाधिक विकली जाणारी कार ही टाटा नेक्सॉन आहे. ही कार उत्कृष्ट फिचरसह पेट्रोल आणि डिझेल दोन्ही ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत आणि 8 ट्रिम पर्यायांत ही कार मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ही एक सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे ज्यामध्ये पाच लोक बसू शकतात. तुम्ही ही कार एकूण आठ ट्रिममध्ये खरेदी करू शकता, ज्याची किंमत 7.80 लाख ते 14.35 लाख रुपये आहे. तुमच्याकडे पूर्ण पेमेंट करण्यासाठी पैसे नसल्यास, तुम्ही लोनसाठी अर्ज देखील करू शकता. आज आम्ही तुम्हाला कारसाठीचे इएमआय कॅल्क्युलेट सांगणार आहोत.
फक्त 1.5 लाख रुपयांत घरी आणा कार
तुमच्याकडे कार घेण्यासाठी संपूर्ण रक्कम नसेल तरी हरकत नाही. तुम्ही दीड लाखांचा डाउन पेमेंट करून 9.8% च्या दराने पाच वर्षांसाठी लोन घेऊ शकता. यात दर महिन्याला तुम्हाला 15341 रुपये इएमआय भरावी लागेल. संपूर्ण लोन अमाउंट 7.25 लाख रुपये होऊन पाच वर्षात हफ्ते भरल्यानंतर तुमचे 1.95 रुपये अतिरिक्त जाईल.
नेक्सॉन कारचे फिचर
SUV मध्ये Android Auto आणि Apple CarPlay सारखे फिचर्स असून 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. यासोबतच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हॉईस कमांड, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, ऑटो एसी, क्रूझ कंट्रोल आणि रेन सेन्सिंग वायपर्स यांसारखे फिचर्स आहेत. टॉप-स्पेक ट्रिममध्ये हवेशीर फ्रंट सीट्स, ऑटो-डिमिंग IRVM, आठ-स्पीकर साउंड सिस्टम आणि एअर प्युरिफायर देखील आहे. (Tata Motors)
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करत असाल तर त्याची ऑन रोड किंमत 8.85 लाख रुपये आहे. तुम्ही ही कार लोनवर खरेदी करत असाल तर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे डाउन पेमेंट करून कार खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्ही तुम्हाला योग्य वाटणाऱ्या बँकांमधून लोन घेऊ शकता. प्रत्येक बँकेचे व्यॅज दरही वेगवेगळे असतात. लोनची अवधी एक वर्षापासून ते सात वर्षांपर्यंत निवडली जाऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.