SUV Cars Under 10 Lakh: काही वर्षांपूर्वी कार घेणे हे प्रत्येकालाच परवडणारे नव्हते. मात्र, आता अगदी कमी किंमतीत एकापेक्षा एक शानदार कार्स भारतीय बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. ईएमआयवर देखील कारला सहज खरेदी करू शकता. तुमची देखील घरासमोर स्वतःची कार उभी करण्याची इच्छा असल्यास बाजारात अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. १० लाखांच्या बजेटमध्ये येणाऱ्या अशाच शानदार कॉम्पॅक्ट एसयूव्हींविषयी जाणून घेऊया.
हे ही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....
Hyundai Venue
ह्यूंडाई वेन्यू कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय कारपैकी एक आहे. भारतीय बाजारात या कारचे E, S, S+/S(O), SX आणि SX(O) हे पाच मॉडेल्स उपलब्ध आहे. बाजारात या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची किंमत ७.५३ लाख रुपये ते १२.७२ लाख रुपयांपर्यंत (एक्स शोरुम) आहे.
टाटा नेक्सॉन
तुम्ही जर एकापेक्षा एक शानदार सेफ्टी फीचर्ससह येणाऱ्या कारला खरेदी करण्याचा विचार करत असाल तर टाटा नेक्सॉन चांगला पर्याय आहे. भारतीय बाजारात या कारचे ८ व्हेरिएंट्स उपलब्ध आहे. कारची किंमत ७.७० लाख रुपयांपासून ते १४.१८ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरुम) आहे.
Maruti Brezza
मारुती सुझुकीच्या अनेक कार्सला भारतीय ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. तुम्हाला जर एसयूव्ही खरेदी करायची असल्यास काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या मारुती ब्रेझाचा विचार करू शकता. या एसयूव्ही कारची एक्स-शोरुम किंमत ७.९९ लाख रुपयांपासून ते १३.९६ लाख रुपयांपर्यंत आहे.
किआ सोनेट
किआने देखील भारतीय ग्राहकांवर स्वतःची छाप सोडली आहे. कमी किंमतीत येणारी किआ सोनेटमध्ये अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहे. ही एसयूव्ही तीन पॉवरट्रेन पर्यायासह उपलब्ध आहे. एसयूव्हीला ७.४९ लाख रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता.
महिंद्रा एक्सयूव्ही३००
महिंद्राच्या कारला भारतीयांचा तुफान प्रतिसाद मिळतो. ग्राहकांना कारसाठी अनेक महिने वाट पाहावी लागते. कंपनीच्या गाड्या आपल्या मजबूतीसाठी ओळखले जाते. महिंद्रा एक्सयूव्ही३०० ची सुरुवाती किंमत ८.४१ लाख रुपये (एक्स-शोरुम) आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.