Air Purifier : घराबाहेरच्या हवा प्रदूषणाला घाबरू नका, स्वस्तात मिळतात विअरेबल एअर प्युरिफायर! शशी थरुरही करतात वापर

Wearable Air Purifier : सध्या देशातील कित्येक महत्त्वाच्या शहरांमधील हवेचं प्रदूषण वाढत चाललं आहे.
Wearable Air Purifier
Wearable Air PurifiereSakal
Updated on

सध्या हवेच्या प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. केवळ दिल्लीतच नाही, तर मुंबई-पुणे आणि छोट्या शहरांमध्ये देखील हवेचं प्रदूषण वाढलं आहे. घरामध्ये शुद्ध हवेसाठी तुम्ही एअर प्युरिफायर घेऊ शकता. मात्र, घराबाहेर फिरताना आपल्याला प्रदूषणाचा सामना करावाच लागतो.

यासाठीच कित्येक कंपन्यांनी विअरेबल एअर प्युरिफायर लाँच केले आहेत. हे प्युरिफायर तुम्ही जुन्या नोकिया मोबाईलप्रमाणे आपल्या गळ्यात देखील घालून फिरू शकता. अगदी एका पॉवरबँक पेक्षाही छोट्या आकाराचे हे डिव्हाईस तुमच्या आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर ठरतात.

अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा वेबसाईट्सवर अगदी दोन हजार रुपयांपासून देखील चांगले Wearable Air Purifire उपलब्ध आहेत. यासोबतच फिलिप्स, Rsenr अशा कंपन्यांचे एअर प्युरिफायर मास्क देखील कमी किंमतीत मिळत आहेत.

Wearable Air Purifier
Delhi Air Pollution: दिल्लीच्या वायू प्रदुषणावर अमेरिकन राजदुतांचं भाष्य; म्हणाले, लॉस एन्जेलिसला...

एअर टेमर

अमेझॉनवर AirTamer A320 हा रिचार्जेबल पर्सनल एअर प्युरिफायर 13,199 रुपयांना उपलब्ध आहे. यावर कित्येक कार्ड आणि EMI ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. सुमारे 15,000 रुपये किंमत असणारा हा प्युरिफायर तुम्ही ऑफरमध्ये 10 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. हाच प्युरिफायर फ्लिपकार्टवर सुमारे 8 हजार रुपयांना उपलब्ध आहे.

काँग्रेस नेते शशी थरुर देखील याच कंपनीचा एअर प्युरिफायर वापरतात. कित्येक वेळा त्यांच्या गळ्यामध्ये हा दिसला आहे. हा रिचार्जेबल एअर प्युरिफायर असून, वजनाला देखील अगदी हलका आहे. याला 105 तासांचा बॅटरी बॅकअप आहे. याला तुम्ही बटणांनी आणि मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने देखील ऑपरेट करू शकता.

Wearable Air Purifier
Mumbai Air Pollution : मुंबईतील हवेचं प्रदूषण वाढलं; बीकेसी आणि चेंबूर ‘ऑरेंज झोन’मध्ये

सध्या देशातील कित्येक महत्त्वाच्या शहरांमधील हवेचं प्रदूषण वाढत चाललं आहे. आता दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे देखील प्रदूषण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच दिवाळीच्या खरेदीमध्ये तुम्ही एअर प्युरिफायरचा समावेश करून तुम्ही स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()