WhatsApp Scams: सावधान...बॉसच्या नावाने आलेल्या या WhatsApp मुळे तुम्ही देखील फसू शकता

WhatsApp हे आज जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं इंस्टंट मल्टिमीडिया अॅप आहे. सध्याच्या घडीला अनेक युजर या अॅपकडे विश्वासार्ह अॅप म्हणून पाहतात. याचाच फायदा आता काही लुटारु टोळ्या घेऊ लागल्या आहेत
WhatsApp Scams
WhatsApp ScamsEsakal
Updated on

WhatsApp Scams: गेल्या काही वर्षाभरात खास करुन कोरोना Corona काळामध्ये फोनकॉल्सवरून किंवा मेसेजच्या माध्यामातून अनेक लोकांची फसवणूक Cheating झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या.

वेगवेगळ्या प्रकारची आमिष देऊन कधी डेटा चोरी तर कधी बँक बॅलेन्समधून रक्कम गायब होणं असे अनेक प्रकार उघडकीस आले होते. व्हाटस्अपवरदेखील अशा वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करून अनेकांना चुना लावण्याचा प्रकार सुरू आहे. Beware The WhassApp Message from your boss may be fraudulent

WhatsApp हे आज जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं इंस्टंट मल्टिमीडिया अॅप आहे.  सध्याच्या घडीला अनेक युजर या अॅपकडे विश्वासार्ह अॅप म्हणून पाहतात. याचाच फायदा आता काही लुटारु टोळ्या घेऊ लागल्या आहेत. 

हे सायबर लुटारू Cyber Crime आता कर्मचाऱ्यांना त्यांचा बॉस बनून फसवण्याचं काम करत आहेत. अशा  एका फसवूकीच्या घटनेचा स्क्रिन शॉर्ट समोर आला आहे. हा स्क्रिनशॉर्ट सोशल मीडियावर Social Media चांगलाच व्हायरल झाला आहे. 

भारतातील ई-कॉमर्स कंपनी मीशो(Meesho) च्या एका कर्मचाऱ्याला कंपनीच्या सीईओंचा WhatsAppवर एक मेसेज आला.. हा मेसेज पाहून आधी तर कर्मचारी हैराण झाला. त्याला हा मेसेज खरा वाटला. मात्र जेव्हा त्याने बारकाव्याने मेसेजचं निरिक्षण केलं तेव्हा त्याला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं. मेसेज पुन्हा नीट वाचल्यावर तो फेक असल्याचं त्याच्या लक्षात आलं.

मीशोचे कर्मचारी शिखर सक्सेना यांनी ही घटना त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केली आहे.  त्यांनी सांगितलं की त्यांना त्यांचे बॉस विहित आत्रे यांचा प्रोफाईल फोटो असलेल्या एका नंबरहून एक मेसेज आला. या मेसेजमध्ये लिहिलं होतं.

“मी सध्या एका क्लाइंटसोबत कॉन्फर्स कॉलमध्ये आहे. मला त्या क्लाइंट काही तरी गिफ्ट द्यायचं आहे. तुम्ही पेटीएमवरून माझ्यासाठी ते गिफ्ट खरेदी करू शकता का? तुम्हाला नंतर याचे पैसे दिले जातील”

असं असलं तरी शिखर यांना ही फसवणूक असल्याचं लक्षात आल्याने ते या जाळ्यात अडकले नाहीत. लोकांना सावध करण्यासाठी त्यांनी या मेसेजचा स्क्रिनशॉर्ट सोशल मीडियावर शेअर केला.

शिखर यांनी सांगितलं की थोडा शोध घेतल्यानंतर हा एक इंटरनॅशनल नंबर असल्याचं त्यांना कळालं. शिवाय या नंबरहून अशा प्रकारचे अनेक मेसेज काही लोकांना पाठवण्यात आले होते. 

आणखी एका युजरनेही अशाच प्रकारचा एक स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे. ज्यात एका सायबर ठगाने एचआर मॅनेजर असल्याचा दावा केला. पॉर्ट-टाइम जॉबच्या मदतीने काही मिनिटांमध्येच ८००-१५०० रुपये कमवता येतील असं सांगून तो तो लोकांना लुबाडण्याचा प्रयत्न करत होता.

वर्क फ्रॉम होमची ऑफर देऊन ८ लाखांचा गंडा

दिल्लीतील गुरुग्राममध्ये एक महिला वर्क फ्रॉम होम स्कॅमच्या विळख्यात अडकल्याने तिचं ८ लाख रुपयांचं नुकसान झालं. गुरुग्राममधील सरिता यांना घर बसल्या पैसे कमावण्याची संधी असा व्हाटसअप मेसेज आला होता. यात युट्यूब चॅनलच्या सबस्क्रिबशनमधून ५० रुपये कमवता येतील असं सांगण्यात आलं होतं.

सरिता यांनी दोन चॅनलला सब्सक्राइब केलं. त्यानंतर त्यांना एका रिसेप्शनिस्टचा फोन आला. सरिता यांना सांगण्यात आलं की त्यांनी काम पूर्ण केल्यानंतरच त्यांना पैसे मिळतील. सरिता यांना पैसे तर मिळाले नाही शिवाय त्यांना ८ लाख रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं. 

सावधान रहा

जर तुम्हालादेखील अशा प्रकारचे मेसेज येत असतील तर रिप्लाय करण्याआधी त्या नंबरची खातरजमा करा. इंटरनेटवर तुम्ही त्या नंबरचा कंट्री कोड चेक करू शकता. तुम्ही एखाद्या कंपनीचं काम करत असाल तर तुमच्या सहकार्यांना देखील अशा प्रकारचे मेसेज आले आहेत का याची विचारपूस करा.

नंबर किंवा मेसेजमध्ये कोणतिही गडबड वाटल्यास वेळीत सावध व्हा. अनेकदा विचित्र कॉम्बिनेशनच्या नंबरहून किंवा इंटरनॅशनल नंबरहून असे कॉल केले जातात. तसचं WhatsApp वर एखाद्या अपरिचित नंबरवर मेसेजसोबत एखादी लिंक आली असल्यास ती लिंक ओपन करू नका. 

आपण जर खबरदारी घेतली तर अशा सायबर ठगांना धडा शिकवणं शक्य आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.