Smartwatch Security Risks: सावधान तुमचं Smartwatch देखील होवू शकतं हॅक, तुमचा डेटा असुरक्षित

Smartwatch Security Risks: स्मार्टवॉच हॅक होण्याचा धोका टाळायचा असेल तर काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेच आहे. कारण जसजसं तंत्रज्ञान विकसित होतं जातं तसं तसे धोके देखील वाढतं जातात
Smartwatch Security Risks
Smartwatch Security RisksEsakal
Updated on

Smartwatch Security Risks: भारतात गेल्या काही वर्षा स्मार्टवॉचचा वापर वाढू लागला आहे. तरुणांसह अनेकजण आता स्मार्टवॉचला पसंती देऊ लागले आहेत. स्मार्टवॉच हे आता केवळ घड्याळ उरलं नसून त्याकडे स्टाईल स्टेटमेंट Style Statement म्हणून पाहिलं जातंय.

अशातच बाजारातही या स्मार्टवॉचची Smart Watch स्पर्धा वाढलीय. वेगवेगळे फिचर्स असलेले स्मार्टवॉच बाजारात येऊ लागले आहेत. अगदी कमी दरापासून ते महागडी प्रिमियम वॉचेस उपलब्ध आहेत. Beware Your smart watch also can be hacked keep your data safe

स्मार्टफोनप्रमाणेच आता स्मार्टवॉचमध्ये अनेक फिचर्स उपलब्ध झाले आहेत. स्मार्टवॉच हे केवळ वेळ पाहण्याच घड्याळ उरलेलं नाही. यामध्ये तुमचे हार्टबीट Heart rate sensors तुमच्या फुटस्टेप्स म्हणजेच तुम्ही किती चाललात, शरिरातील वॉटर लेव्हल, तुमचा रक्तदाब या सगळ्यांची माहिती मिळते.

त्यासोबत अनेक स्मार्टवॉचेसमध्ये स्ट्रेस मॉनिटर्स आणि स्लिप मॉनिटर्सही असतात. जेणेकरून तुमची झोप आणि तुम्ही तणावात आहात का हे देखील माहिती होतं. वेगवेगळ्या ब्रॅण्डनुसार वेगवेगळे फिचर पाहायला मिळतात Smartwatch features.

हे झाले फिटनेस प्रेमी आणि आरोग्याकडे लक्ष देणाऱ्यांसाठी महत्वाचे असणारे फिचर. तर या शिवाय एखाद्या मेसेजसाठी किंवा फोन कॉससाठी सारखा फोन हातात घेऊ नये म्हणून स्मार्टवॉचवरूनच तुम्ही कॉल रिसिव्ह करू शकता आहे.

ब्लूटूथ हेडफोन्स किंना इअरपॉडने संवाद साधू शकता. तसचं मेसेज पाहणे, फोटो, मेल, GPS अशा अनेक सुविधा स्मार्टवॉचमध्ये असतात. पण तुम्हाला माहितेय का स्मार्टफोन प्रमाणेच तुमचं स्मार्टवॉचदेखील हॅक होवू शकत.

  • स्मार्टवॉचमध्ये देखील ऑपरेटिंग सिस्टम, GPS, ब्लूटूथ आणि ई-सिम सपोर्ट यांसारखे फिचर्स असतात.तसचं स्मार्टवॉचमध्ये क्लाउड कनेक्टिव्हिटी आणि सेंसर्स असतात त्यामुळे स्मार्टवॉचही हॅक करणं शक्य आहे. 

  • स्मार्टवॉचला तुमच्या मोबाईलशी जोडण्यासाठी ब्लूटूथ आणि वाय-फायचा वापर करावा लागतो. अॅपच्या माध्यमातून वॉचमधील डेटा फोनमध्ये ट्रान्स्फर केला जातो. तुमचं ब्लूटूथ आणि वाय-फाय सुरू असल्याने हॅकर अगदी सहजपणे तुमच्या स्मार्टवॉचमध्ये मालवेअर इन्स्टॉल करू शकतात. रॅन्समवेअर अटॅक करून ते तुमचा डेटा कलेक्ट करू शकतात, त्याचप्रमाणे तुमचं लोकेशन, रोजच्या एक्टीव्हिटी, सवयी आणि पासवर्डही हॅक होवू शकतात. 

  • स्मार्टवॉच हॅक करून तुमच्यावर पाळत ठेवली जाऊ शकते. ज्यामुळे तुम्ही कुठे राहता, कुठे जाता याची माहिती घेणं एखाद्याला सहज सोप्प आहे. मॅपसाठी किंवा दररोजच्या फूटस्टेप्सची माहिती ठेवण्यासाठी या वॉचमधील GPS सतत सुरू असतं. शक्यतो ते आवर्जुन बंद केलं जातं नाही. परिणामी तुम्ही कुठे येता जाता यावर नजर ठेवणं शक्य होतं. 

  • अलिकडे स्मार्टवॉचच्या मदतीनेच फोन कॉल करणं तसचं SMS करणं किंवा पाहण्याला स्मार्टवॉच युजर प्राधान्य देत आहेत. यामुळे या वॉचमध्ये कॉल डेटा आणि SMS डेटा संग्रहित राहतो. शिवाय काही प्रिमियम स्मार्टवॉचमध्ये तुम्ही डिजिटल पेमेंटही करू शकता. अर्थातच हा सर्व डेटा इंटनेट किंवा ब्लूटूथच्या मदतीने ट्रांसमिस होतो. त्यामुळे हा सर्व डेटा हॅक होवू शकतो. 

Smartwatch Security Risks
Tesla Car : टेस्लामधील त्रुटींमुळे कार हॅक होण्याची शक्यता

स्मार्टवॉच हॅक होण्याचा धोका टाळायचा असेल तर काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेच आहे. कारण जसजसं तंत्रज्ञान विकसित होतं जातं तसं तसे धोके देखील वाढत जातात. यासाठीच खबरदारी घेणं जास्त गरजेचं आहे       

  •  स्मार्टफोनला हॅकिंगपासून वाचवण्यासाठी कोणतिही अननोन रिक्वेस्ट स्विकारू नका.

  •  जर वॉचची बॅटरी झपाट्याने उतरतेय म्हणजेच कमी होतेय असं निदर्शनास आल्यास लगेच वॉचला फॉर्मेट करा. 

  •  WiFi ला कायम सिक्योर ठेवा तसचं सॉफ्टवेअरही कायम अपडेट ठेवा.

  •  स्मार्टवॉनमधील कोणते अॅप तुमच्या उपयोगाचे आहेत हे पडताळून पहा आणि गरज नसलेले थर्ड पार्टी अॅप Third Party Apps डिलीट करा.

  •  स्मार्टवॉचमधील डेटा वरेचेवर डिलीट करा.

  •   जेव्हा तुम्ही स्मार्टवॉच घालणार नसा तेव्हा ते बंद ठेवा.

  •  तुम्हाला लोकेशन मॉनिटर्गिंबद्दल काळजी असेल तर गरज नसल्यास लोकेशन GPS बंद ठेवा. 

  •  तुमच्या वॉचला लॉक कोड वरचेवर बदलत रहा.

Smartwatch Security Risks
Technology Tips : आता फेसबुक-इन्स्टाग्रामवर अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी भरावे लागणार पैसे

एकंदरच काही गोष्टींची काळजी घेतल्यास आपण स्मार्टवॉचच्या हॅकिंगचा धोका टाळू शकतो. किंवा ज्यांना फक्त फिटनेसच्या मदतीसाठी असे घड्याळ हवे असतील तर त्यांनी फिटवॉची निवड करावी.

या घड्याळांमध्ये फिटनेसशी निगडीत म्हणजेच केवळ फूटस्पेप, हार्टरेट, स्लीप ट्रॅकर असे पर्याय असतात. या घड्याळाना तुमच्या मोबाईलशी जोडण्याची गरज नसते. त्यामुळे डेटा चोरीचा प्रश्न उद्भवत नाही. शिवाय अशा फिटवॉचच्या किमती कमी असतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.