Bike Riding Tips : पावसाळ्यात दुचाकी चालवताना काय घ्यावी खबरदारी? या टिप्स वाचवतील तुमचा जीव

पावसात दुचाकी चालवताना कोणती खबरदारी घ्यायची याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
Bike Riding Tips
Bike Riding TipsEsakal
Updated on

देशात जवळपास सगळीकडे मान्सूनपूर्व पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. काही दिवसांमध्येच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. अशात पाऊस सुरू असताना दुचाकी चालवणं हे धोक्याचं असतं. कित्येक वेळा ही चूक जीवावरही बेतू शकते. त्यामुळेच पावसात दुचाकी चालवताना कोणती खबरदारी घ्यायची याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

देशात दुचाकी अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. २०२१ च्या आकडेवारीनुसार देशात एका वर्षात सुमारे ७० हजार जणांचा बाईक अपघातात मृत्यू होतो. पावसाळ्यात दुचाकींचा अपघात होण्याची शक्यता अधिक वाढते, त्यामुळे वेळीच योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं असतं.

Bike Riding Tips
Royal Enfield Electric Bike : लवकरच येणार 'इलेक्ट्रिक बुलेट'; रॉयल एनफिल्डच्या सीईओंनी दिली महत्त्वाची माहिती

खड्डे चुकवा

भारतात रस्त्यांवर असणारे खड्डे ही नित्याची बाब झाली आहे. त्यातच पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साठल्यामुळे त्यांची नेमकी खोली लक्षात येत नाही. अशा वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे गाडी चालवताना खबरदारी घेणं गरजेचं आहे.

सुरक्षित अंतर ठेवा

पावसात गाडी चालवताना समोरून चाललेल्या गाडीपासून सुरक्षित अंतर ठेवणं गरजेचं आहे. पावसामुळे रस्ते ओले झालेले असतात. अशा वेळी अचानक ब्रेक दाबल्यामुळे गाडी स्लिप होण्याचा धोका असतो. समोरच्या वाहनात आणि तुमच्यात योग्य अंतर असल्यास पटकन ब्रेक दाबण्याची गरज भासत नाही.

Bike Riding Tips
Royal Enfield Electric Bike : लवकरच येणार 'इलेक्ट्रिक बुलेट'; रॉयल एनफिल्डच्या सीईओंनी दिली महत्त्वाची माहिती

रायडिंग गिअर

पावसात गाडी चालवताना पूर्ण चेहऱ्याला कव्हर करेल असं हेल्मेट, चांगला रेनकोट, वॉटरप्रूफ रायडिंग बूट्स आणि हँडग्लोव्ह्ज असे गिअर वापरणं फायद्याचं ठरतं. या सर्व गोष्टी चांगल्या क्वालिटीच्या असणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुमचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित होतो.

हेल्मेटमध्ये करा बदल

पावसात हेल्मेटच्या काचेवर पाणी साठून समोरचा रस्ता दिसण्यास अडचण होते. असं होऊ नये, यासाठी कारसाठी वापरण्यात येणाऱ्या वॅक्सचा उपयोग हेल्मेटच्या काचेवर करा. यामुळे पावसाचे थेंब हेल्मेटच्या काचेवर थांबणार नाहीत.

लाईट्सचा वापर

पाऊस सुरू असताना अगदी थोड्या अंतरावरची गोष्ट दिसणंही अवघड असतं. त्यामुळे अशा वेळी आपल्या दुचाकीच्या लाईट्सचा वापर करणं गरजेचं आहे. हेडलाईट, टेल लाईट, इंडिकेटर अशा गोष्टींचा वापर करून इतरांना आपल्या उपस्थितीची जाणीव करून देणं गरजेचं आहे.

Bike Riding Tips
Electric Bikes : आजपासून इलेक्ट्रिक बाइक्सच्या किंमती वाढल्या; मोदी सरकारच्या 'या' निर्णयाचा फटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.