Bill Gates Prediction on AI : मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, म्हणजेच एआयबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. येत्या पाच वर्षांमध्ये आपल्या सर्वांचं जीवन अगदी बदलणार असल्याचं ते म्हटले आहेत. येत्या काळात सर्वांकडेच एआय-पॉवर्ड डिजिटल एजंट्स असतील, जे आपली कामं करतील असंही बिल गेट्स म्हणाले.
सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, म्हणजेच एआयचा बोलबाला सगळीकडे पहायला मिळत आहे. चॅटजीपीटी, गुगल बार्ड, मायक्रोसॉफ्ट बिंग, एक्स एआयचं ग्रॉक असे कित्येक एआय टूल्स समोर आले आहेत. चॅटजीपीटी बिल्डरचा वापर करुन आता कोणीही व्यक्ती चॅटबॉट किंवा एआय टूल्स बनवू शकणार आहेत. यातच बिल गेट्स यांनी केलेली भविष्यवाणी चर्चेचा विषय ठरत आहे.
बिल गेट्स म्हणाले, की नवीन येणारे एआय टूल्स हे केवळ कंटेंट जनरेशनसाठीच नाही, तर इतर कामांसाठी देखील वापरले जातील. यामुळे लोकांची कार्यक्षमता वाढणार आहे. अगदी सर्वसामान्य व्यक्तींकडे देखील आपली कामं करण्यासाठी 'एआय पॉवर्ड डिजिटल एजंट' असतील. हे एजंट अधिक पॉवरफुल आणि फास्ट असतील.
ते पुढे म्हणाले, येत्या काळात एआय एजंट्स आपली सर्वं कामं करतील. ई-मेल लिहिणं, बिझनेस प्लॅन तयार करणं, प्रेझेंटेशन तयार करणं, बर्थडे रिमाइंडर देणं, विमान तिकीट किंवा हॉटेल बुक करणं, कम्प्युटर कोडमधील बग हटवणं अशी कित्येक कामं एआय एजंट करु शकतील. (Tech News)
भविष्यातील या एआय एजंट्सवर कोणत्या एका कंपनीचा दबदबा राहणार नाही. मोनोपॉली संपल्यामुळे जास्तीत जास्त एआय टूल्स कमी किंमतीला उपलब्ध होतील. त्यामुळेच ही टेक्नॉलॉजी लवकरच सामान्यांना उपलब्ध होईल, असा विश्वास देखील बिल गेट्स यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.