TikTok Ban: अमेरिकेत टिकटॉक मोजतेय शेवटची घटका! संसदेच्या कनिष्ठ सभागृहात बंदीचे विधेयक मंजूर

TikTok In US: 2018 मध्ये 'टिक-टॉक'ची लोकप्रियता झपाट्याने वाढली आणि ऑक्टोबर 2018 मध्ये ते अमेरिकेत सर्वाधिक डाउनलोड केलेले ॲप बनले होते.
TikTok Ban In US
TikTok Ban In USEsakal
Updated on

अमेरिकन काँग्रेसचे (संसद) कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने नुकतेच एक विधेयक मंजूर केले. यामध्ये अशी तरतूद आहे की, जर चिनी नागरिकाच्या मालकीचे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकने आपला अमेरिकन व्यवसाय विकला नाही तर त्यावर देशात बंदी घालता येईल. (TikTok Ban In US)

या विधेयकात सहा महिन्यांत भागभांडवल विकण्याची मुदत देण्यात आली आहे. हे विधेयक डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन पक्षांच्या प्रचंड पाठिंब्याने सभागृहात मंजूर झाले.

दोन्ही पक्षांनी ॲपचे मालक असलेल्या चिनी तंत्रज्ञान कंपनी बाइट्स लिमिटेडच्या संबंधात राष्ट्रीय सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती.

TikTok Ban In US
Hossein Amirabdullah : ड्रोन हल्ल्यात इस्राईलचा सहभाग नाही; इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचे स्पष्टीकरण; चौकशी सुरू

सुधारित तरतुदी आता वरच्या सभागृहात म्हणजे सिनेटकडे मंजुरीसाठी पाठवल्या जातील. तथापि, कायदा केला असला तरीही, कंपनीला खरेदीदार शोधण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागेल आणि ते ॲपच्या लाखो युजर्सना त्यांच्या पहिल्या दुरुस्तीच्या अधिकारांपासून वंचित ठेवेल असा युक्तिवाद करून कायद्याला संभाव्यपणे आव्हान देऊ शकते. TikTok चे अमेरिकेत 17 कोटी युजर्स आहेत.

TikTok Ban In US
Sundar Pichai : ''कामावर फोकस करा, राजकारणावर नव्हे'' गुगलचे सीईओ सुंदर पिचाई कर्मचाऱ्यांवर भडकले

काय आहे टिकटॉक?

'TikTok' एक सोशल मीडिया ॲप्लिकेशन आहे ज्याद्वारे स्मार्टफोन युजर्स छोटे व्हिडिओज (15 सेकंदांपर्यंत) तयार आणि शेअर करू शकतात.

'ByteDance' ही 'TikTok'ची मालकी असलेली कंपनी आहे. ज्यांनी सप्टेंबर 2016 मध्ये चीनमध्ये 'टिक-टॉक' लाँच केले. 2018 मध्ये 'टिक-टॉक'ची लोकप्रियता झपाट्याने वाढली आणि ऑक्टोबर 2018 मध्ये ते अमेरिकेत सर्वाधिक डाउनलोड केलेले ॲप बनले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.