Blinkit Photo Delivery : फोटो काढायला स्टुडिओमध्ये जाण्याची गरज संपली; Blinkit वरुन मागवा तुमचे पासपोर्ट साइज फोटो,10 मिनिटात होम डिलिव्हरी

Blinkit Passport Sized Photo 10 Min Home Delivery : Blinkit आता तुमच्या घरी फक्त 10 मिनिटांत पासपोर्ट साइज फोटो पोहोचवनार आहे.
Blinkit Launches 10-Minute Passport Photo Delivery Service in Delhi, Gurugram
Blinkit Launches 10-Minute Passport Photo Delivery Service in Delhi, Gurugramesakal
Updated on

Blinkit Update : आता पासपोर्टसाठी फोटो काढण्यासाठी स्टुडिओत जाण्याची जास्त गरज उरणार नाही. कारण भारतातील लोकप्रिय वेगवान डिलेव्हरी सेवा Blinkit घेऊन आले आहे एक धमाकेदार सर्व्हिस. Blinkit आता तुमच्या घरी फक्त 10 मिनिटांत पासपोर्ट साइज फोटो पोहोचवणार आहे.

Blinkit ची ही सर्व्हिस आधीच कागदपत्रांची प्रिंट देत होती. आता त्यामध्ये त्यांनी पासपोर्ट साइज फोटोचा सुपरफास्ट ऑप्शन जोडला आहे. Blinkit ची किंमतही सामान्य फोटो स्टुडिओपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे आता अचानक फोटो लागल्यास Blinkit तुमची गरज पूर्ण करून देईल.

Blinkit चे सीईओ अल्बिंदर ढिंडसा यांनी ही नवी सर्व्हिस लाँच करताना सांगितले, "विसा अर्ज, परीक्षा प्रवेशपत्र किंवा भाडे कराराच्या कागदपत्रांसाठी अचानक पासपोर्ट साइज फोटो लागलतात ना? आता दिल्ली आणि गुरुग्राममधील Blinkit ग्राहकांना 10 मिनिटांत पासपोर्ट फोटो मिळणार आहेत! आम्ही ही नवी सेवा लाँच करण्यास उत्सुक आहोत आणि तुमच्या अभिप्रायाची वाट पाहत आहोत. तुमच्या सुचनेनुसार आम्ही या सेवेत सुधारणा करत राहू."

Blinkit Launches 10-Minute Passport Photo Delivery Service in Delhi, Gurugram
Instagram AI Tips : इंस्टाग्रामवर आलंय स्टोरी बॅकग्राऊंड चेंज फिचर,कसं वापराल? जाणून घ्या

ही सुविधा अगदी सोपी आहे. तुम्ही Blinkit अॅपवरून किराणा किंवा इतर घरातील वस्तू मागवता तसाच फोटो मागवू शकता. ऑर्डर झाल्यानंतर फक्त 10 मिनिटांत फोटो तुमच्या घरी पोहोचवले जातील. फोटो स्टुडिओत धाव घेण्याची किंवा घाईगड करून फोटो काढून देणारे दुकान शोधण्याची गरज नाही.

Blinkit Launches 10-Minute Passport Photo Delivery Service in Delhi, Gurugram
BSNL Network Check : तुमच्या एरियामध्ये BSNL ला रेंज आहे की नाही? सिमकार्ड घेण्यापूर्वीच असं चेक करा नेटवर्क स्टेटस

Blinkit या नव्या सेवेबद्दल खूप उत्सुक आहे आणि ग्राहकांच्या अभिप्रायाची वाट पाहत आहे. या अभिप्रायानुसार ते या सेवेत सुधारणा करतील. हळूहळू भारतातील इतर शहरांमध्येही ही सेवा सुरु होईल, अशी माहिती Blinkit ने दिली आहे.

आता दिल्ली किंवा गुरुग्राममध्ये असाल आणि अचानक पासपोर्ट फोटो लागल्यास Blinkit तुमची सोय करून देईल. वेगवान जगात वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन Blinkit ने ही छोटी पण उपयुक्त सेवा सुरु केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.