BMW ने लाँच केली iX Electric SUV, कारसह मिळेल वाॅलबाॅक्स चार्जर

जर्मन कंपनी BMW ने भारतात इलेक्ट्रिक कार सादर केली आहे.
BMW Electric SUV Ix
BMW Electric SUV Ix esakal
Updated on

नवी दिल्ली : जर्मन कंपनी BMW ने भारतात इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. कंपनीने लक्झरी Electric SUV IX ला बाजारात उतरवले आहे. तिची सुरुवातीची किंमत १.१६ कोटी रुपये आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार आगामी सहा महिन्यात दोन आणखीन इलेक्ट्रिक कार लाँच केले जाणार आहेत. या व्यतिरिक्त कंपनी भारताच्या ३५ शहरांमध्ये स्वतःची डिलर नेटवर्कवर सर्व टच पाॅइंटवर फास्ट चार्जरही बसवणार आहे. बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाने माहिती देताना सांगितले, पुढील सहा महिन्यांत तीन इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करणार आहे. त्यातील एक Electric SUV IX ला बाजारात उतरवण्यात आले आहे. प्रारंभी बीएमडब्ल्यू आयएक्सबरोबर बीएमडब्ल्यू वाॅलबाॅक्स चार्जर देत आहे. कंपनी म्हणाली होती की तयार उत्पादन लवकरच आयात करुन देशातील प्रमुख शहरांमध्ये बीएमडब्ल्यू डिलरशीप किंवा कंपनीच्या वेबसाईटच्या माध्यमातून बुक करता येऊ शकते. (BMW Electric SUV IX Introduces In India)

BMW Electric SUV Ix
Maruti Brezza ने मारली बाजी, सर्वाधिक विकली जाणारी SUV ठरली

४२५ किलोमीटर रेंज

- बीएमडब्ल्यू आयएक्स मिनरल व्हाईट, फायटोनिक ब्लू, ब्लॅक सॅफायर आणि सोफिस्टो ग्रे या रंगात उपलब्ध आहे. ती पर्याय म्हणून बीएमडब्ल्यू इंडिव्हिज्युल एव्हेंट्युरिन रेड मॅटॅलिक पेंट फिनिशमध्येही उपलब्ध आहे. ते ऑल व्हिल ड्राईव्ह युनिटसह येते. जे दोन इलेक्ट्रिक मोटर्स ( फ्रंट आणि रिअर एक्सलसाठी) , सिंगल स्पीड ट्रान्समिशन आणि पाॅवर इलेक्ट्राॅनिक्सद्वारे सुरु होते. ३२६ एचपीच्या आऊटपुटसह आयएक्स लगेच ६.१ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडते. यात दोन उच्च व्होल्टेज बॅटऱ्यांची संयुक्त क्षमता ७६.६ kWh आहे. ती ४२५ किलोमीटरपर्यंत रेंज देते. पहिल्यांदाच बीएमडब्ल्यू आयएक्स ११ kW पर्यंत सुरक्षित आणि सुविधाजनक चार्जिंग देते.

BMW Electric SUV Ix
Tata Altroz ​​प्रीमियम हॅचबॅकचे नवीन व्हेरियंट भारतात लॉन्च

यांच्याशी टक्कर

- बीएमडब्ल्यू आयएक्स भारतात पोर्चे टायकन, मर्सिडिज बेन्झ ईक्यूसी आणि ऑडी ई-ट्रोनला टक्कर देईल. बीएमडब्ल्यूचे उद्देश आहे, की पुढील वर्षात भारताच्या प्रत्येक कानकोपऱ्यात ही कार पोचायची आहे.

बीएमडब्ल्यू आयएक्सची वैशिष्ट्ये

- बीएमडब्ल्यू काॅकपिटमध्ये नॅव्हिगेशनसह फ्रि स्टॅंडिंग बीएमडब्ल्यू कर्व्ड डिस्प्ले, स्टेअरिंग व्हिलच्या मागे १२.३ इंचाचे डिजिटल सूचना डिस्प्ले, १४.९ इंचाचे कंट्रोल डिस्प्ले आणि बीएमडब्ल्यू हेड-अप डिस्प्ले आदींचा समावेश आहे. ती अॅपल कार प्ले आणि अँड्राॅईड ऑटोसह येते. बीएमडब्ल्यू आयएक्समध्ये १८ स्पीकर्सबरोबर हरमन कार्डन सराऊंड साऊंड सिस्टिमही आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.