लवकरच येतेय BMW ची इलेक्ट्रिक कार; सिंगल चार्जमध्ये धावेल 425 किमी

bmw ev
bmw ev
Updated on

जगप्रसिध्द कार निर्माता कंपनी BMW आपली नवीन इलेक्ट्रिक SUV भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने येत्या 13 डिसेंबर रोजी BMW IX इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली जाईल अशी घोषणा केली आहे. चला तर मग जाणून घेऊया या नवीन इलेक्ट्रिक कारची खासियत काय आहे आणि ती किती रेंज देते...

युरो NCAP कडून 5 स्टार सुरक्षा रेटिंग

BMW IX इलेक्ट्रिक कार चालवताना तुम्हाला बेस्ट सुरक्षा मिळणार आहे, सुरक्षिततेच्या दृष्टीने Euro NCAP ने या गाडीला 5 स्टार रेट केले आहे. एनकॅपच्या मते, ड्रायव्हर आणि पॅसेंजर सीटमधील नवीन इंटरएक्टिव्ह एअरबॅगची क्रॅश टेस्ट दरम्यान तपासली गेली आहे, ज्यामध्ये लक्झरी एसयूव्हीला 5-स्टार रेटिंग मिळाले. याशिवाय, लहान मुलांची सुरक्षा तपासण्यासाठी क्रॅश टेस्टमध्ये मागून देखील धडक देऊन टेस्टिंग करण्यात आली आहे, या कारला समोरील आणि बाजूच्या क्रश टेस्टमध्ये 5 स्टार स्कोअर देण्यात आला आहे.

bmw ev
मुलांच्या नावाने उघडा PPF खाते; मिळतील अनेक फायदे, पाहा प्रोसेस

बॅटरी आणि रेंज

भारतीय बाजारपेठेत ही कार 2 व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले जाईल, ज्यामध्ये xDrive 40, xDrive 50 यांचा समावेश आहे. BMW IX मध्ये 76kWh बॅटरी दिली जाईल, पहिल्या वेरिएंटबद्दल सांगायचे तर, ते 322 एचपी पॉवर आणि 630 एनएम पीक टॉर्क जनरेट करते, कंपनीने दावा केला आहे ही कार एका चार्जवर 414 किमी चालते. तर XDrive 50 हा कार 523 hp ची पॉवर आणि 765 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच ही गाडी एका चार्जवर 611 किमी धावू शकते.या इलेक्ट्रिक SUV ला कंपनीची पाचव्या जनरेशनचे ऑल-इलेक्ट्रिक पॉवरट्रेन मिळेल ज्यामध्ये इलेक्ट्रिक ऑल-व्हील-ड्राइव्ह (AWD) कार्यक्षमता देण्यासाठी प्रत्येक एक्सलवर इलेक्ट्रिक मोटर दिलेली आहे.

bmw ev
BSNL vs Jio : 250 रुपयांपेक्षा कमीत कोणाचा प्लॅन आहे बेस्ट? वाचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.