boAt Wave Electra available for sale: boAt ने काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारात आपली नवीन स्मार्टवॉच boAt Wave Electra ला लाँच केले आहे. या स्मार्टवॉचची आता विक्री सुरू झाली आहे. २ हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या या वॉचमध्ये १.९१ इंच डिस्प्ले, ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट मिळेल. दमदार फीचर्ससह boAt Wave Electra च्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
boAt Wave Electra ची किंमत आणि उपलब्धता
boAt Wave Electra स्मार्टवॉचला कंपनीने फक्त १,७९९ रुपये किंमतीत लाँच केले आहे. या वॉचला तुम्ही boAt-lifestyle.com आणि ई-कॉमर्स साइट Amazon वरून खरेदी करू शकता.
हेही वाचा: जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
boAt Wave Electra चे स्पेसिफिकेशन्स
boAt Wave Electra स्मार्टवॉचमध्ये १.८१ इंच एचडी डिस्प्ले देण्यात आला असून, याची पीक ब्राइटनेस ५५० निट्स आहे. पाणी आणि घामापासून सुरक्षेसाठी वॉचला आयपी६८ रेटिंग मिळाले आहे. वॉचला हाय-क्वालिटी अॅल्यूमिनियम मिक्स मेटलद्वारे तयार करण्यात आले आहे.
वॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटर, SpO2 सेंसर, स्लीप ट्रॅकर, डेली अॅक्टिव्हिटी ट्रॅकर, ब्रीदिंग एक्सरसाइज आणि वॉटर अलर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये १०० पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड दिले आहेत.
boAt च्या वॉचमध्ये कॉलिंगचा देखील सपोर्ट दिला आहे. यामुळे तुम्हाला कॉलिंगसाठी फोनची गरज नाही. कॉलिंगसाठी वॉचमध्ये बिल्ट-इन स्पीकर, मायक्रोफोन आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट मिळेल. यूजर्स या वॉचमध्ये ५० कॉन्टॅक्ट्स सेव्ह करू शकता. कॉलला क्विक अॅक्सेस करण्यासाठी एक डायल पॅड देखील आहे.
या वॉचमध्ये सिरी आणि गुगल वॉइस असिस्टेंटचा देखील सपोर्ट दिला आहे. याशिवाय, वॉचमध्ये 2048 आणि व्हॅक-ए-मोल सारख्या दोन बिल्ट-इन गेम देखील दिल्या आहेत. यात वेदर अपडेट, फाइंड माय फोन, म्यूझिक आणि कॅमेरा कंट्रोल सारखे फीचर्स यात मिळतील. बॅटरीबद्दल सांगायचे तर एकदा चार्जवर वॉचची बॅटरी ७ दिवस सहज टिकेल. तर ब्लूटूथ कॉलिंग फीचर असल्यास बॅटरी २ दिवस टिकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.