boAt ची नवीन स्मार्टवॉच झाली लॉंच; किंमतही तुमच्या बजेटमध्ये

boat wave style smartwatch launched in india know features and specifications
boat wave style smartwatch launched in india know features and specifications
Updated on

boAt ने भारतीय वापरकर्त्यांसाठी नवीन स्मार्टवॉच boAt Wave Style लॉंच केली आहे. या एका चार्जवर 15 दिवस चालणाऱ्या या स्मार्टवॉचची किंमत 1299 रुपये आहे. कंपनीने हे स्मार्टवॉ अॅक्टिव्ह ब्लॅक, बेज, डीप ब्लू आणि ऑलिव्ह ग्रीन या चार रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केले आहे. कंपनीच्या वेबसाइट व्यतिरिक्त, तुम्ही Amazon India वरून देखील ते खरेदी करू शकता. boAt च्या या नवीन स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला हेल्थ आणि फिटनेसवर लक्ष ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे फीचर्स देखील मिळतील.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनी वॉचमध्ये 1.69-इंचाचा HD डिस्प्ले देत आहे. स्क्वेअर डायल असलेले हे घड्याळ IP68 रेटेड वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट आहे. यामध्ये, कंपनी 150 पेक्षा जास्त वॉच फेस देखील ऑफर करत आहे, जे वापरकर्ते त्यांच्या स्टाइल आणि मूडनुसार सेट करू शकतात. हे घड्याळ आरोग्य आणि फिटनेसच्या बाबतीतही खूप उपयोगी आहे. तुमच्या हर्ट रेट मॉनिटर करण्याव्यतिरिक्त, ही स्मार्टवॉच तुमची SpO2 पातळी आणि झोपेची गुणवत्ता देखील ट्रॅक करते.

boat wave style smartwatch launched in india know features and specifications
TVS ने लाँच केली नवीन ज्युपिटर क्लासिक स्कूटर, जाणून घ्या किंमत-फीचर्स

वॉच गाइडेड ब्रीदिंग सेशन्स यासह सिडेंट्री नोटिफिकेशन देखील देते. यामध्ये तुम्हाला 10 स्पोर्ट्स मोड्सचाही सपोर्ट मिळेल. boAt चे हे घड्याळ आरोग्य आणि व्यायाम डेटा Google फिट आणि Apple हेल्थ अॅप्ससोबत सिंक करते. कंपनी घड्याळात इनबिल्ट boAt Crest App देखील देत आहे, जे हेल्थ इकोसिस्टीम तयार करण्यासाठी काम करते.

फिजिकल बटणासह आलेल्या या स्मार्टवॉचमध्ये, तुम्हाला 220mAh बॅटरी मिळेल. ही बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 15 दिवस टिकते. या वॉचमध्ये तुम्हाला कॅमेरा कंट्रोल, नोटिफिकेशन डिस्प्ले आणि म्युझिक कंट्रोल सारखे फीचर्स देखील मिळतील.

boat wave style smartwatch launched in india know features and specifications
Google Pixel वॉच खिशाला परवडेल का? किती असेल किंमत जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.