Sunita Williams : सुनीता विल्यम्सची परती लांबणीवर; अवकाशात राहून करणार 'हे' संशोधन,जाणून घ्या परतीची तारीख

Starliner Return : नासाने Boeing Starlinerची परतीची तारीख बदलली,होणार नवे संशोधन
nasa delays starliner return june 26
nasa delays starliner return june 26esakal
Updated on

NASA : अमेरिकन अंतराळ संस्था (NASA) ने अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांच्या पृथ्वीवरील परतीच्या तारखेत पुन्हा एकदा बदल केला आहे. स्टारलाइनर या अंतराळयानाद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पाच जून रोजी पोहोचलेल्या.पण आता त्यांच्या परतीची तारीख बदलली आहे. सुनीता विल्यम्स २२ जून ऐवजी आता २६ जून रोजी पृथ्वीवर परत येणार आहेत.

स्टारलाइनर या अंतरिक्षयानाद्वारे सुनीता विलियम्स आणि Butch विल्मोर हे अंतरिक्षवीर ५ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) यशस्वीरित्या पोहोचले होते. मात्र, या प्रवासा दरम्यान यानाला काही तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे नासाने या अंतरिक्षयानाची सुरक्षित परती सुनिश्चित करण्यासाठी अधिक तपासणी आणि तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

nasa delays starliner return june 26
Putin North Korea Visit : पुतिन यांनी किम जोंग उनसाठी चालवलेली कार आहे एकदम जबरदस्त! काय आहेत फिचर्स; जाणून घ्या

यामुळे सुनीता विल्यम्स आता अंतराळात अधिक काळ राहून निरिक्षण आणि संशोधन कार्य करू शकणार आहेत. ही वाढीव मुदत त्यांना अंतराळातील अनुभव आणखी समृद्ध करण्याची संधी देईल,असे तज्ज्ञांचे मत आहे.

२६ जून रोजी पृथ्वीकडे परतण्याआधी सुनीता विलियम्स अंतराळ स्थानकावर अधिक काळ राहणार असल्याने भारतासह जगभरातील अंतरिक्ष क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अंतरिक्षाची आवड असलेल्यांमध्ये उत्साह वाढला आहे.

nasa delays starliner return june 26
Aliens On Earth: पृथ्वीवर माणसांप्रमाणेच राहत आहेत 'सिक्रेट' एलियन्स; हार्वर्ड विद्यापीठाचे संशोधन कितपत खरे?

सुनीता विल्यम्स यांची ही आकाश भरारी दोन वेळा रद्द करण्यात आली होती.पण ५ जून ला अखेर त्यांनी आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बच विल्मोर यांनी अंणभरारी घेतली. त्यांचे boeing starliner हे अवकाशयान देखील खूप चर्चेत होते.आता जवळपास २२ दिवसानंतर विल्यम्स आणि त्यांचे सहकारी पुन्हा पृथ्वीवर परतण्याची सर्व जण उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.