वॉशिंग्टन : ‘नासा’च्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात (आयएसएस) घेऊन जाणारे स्टारलायनर यान तीन महिन्यांनंतर शनिवारी सकाळी नऊ वाजून ३२ मिनिटांनी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) पृथ्वीवर उतरले. न्यू मेक्सिकोमधील व्हाइट सँड या वाळवंटातील अवकाश तळावर यान उतरले, ते मात्र या दोन्ही अवकाशयात्रींविना.