येतेय 'मेड इन इंडीया' इलेक्ट्रिक स्कूटर, फक्त 499 रुपयात करा बुक

Bounce Infinity Electric Scooter
Bounce Infinity Electric ScooterGoogle
Updated on

Bounce Infinity Electric Scooter : सध्या देशात वाढच्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सध्या इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे ग्राहतकांचा कल वाढला आहे. अनेक वाहन निर्मीती कंपन्या त्यांचे इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात घेऊन येत आहेत. या दरम्यान आणखी एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर येत्या काही दिवसांत भारतात दाखल होणार आहे आणि ती पूर्णपणे मेड इन इंडिया आहे. बाऊन्स कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाऊन्स इन्फिनिटी इलेक्ट्रिक स्कूटर पुढील महिन्यात 2 डिसेंबर रोजी भारतात लाँच करणार आहे, जी आकर्षक लुकसह हायटेक फीचर्सनी सुसज्ज असेल. लाँचपूर्वी, बाऊन्स इन्फिनिटी इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग सुरू झाली असून तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर 499 रुपयांच्या भरुन देखील बुक करू शकता.

बाऊन्स इन्फिनिटी इलेक्ट्रिक स्कूटरच्या लुक आणि फीचर्सबद्दल सांगायचे झाल्यास, त्याचे प्रोफाइल एरोडायनामिक ठेवण्यात आले आहे. रेट्रो स्टाईल फ्रंट फेंडर्स, राउंड हेडलॅम्प्स, साइड-माउंटेड टेललॅम्प्स, सिंगल पीस सीट्स, एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल, स्पोर्टी अलॉय व्हील आणि सभ्य ग्रॅब रेल्स यांसारखी इक्सटर्नल फीचर्स देण्यात आले आहेत. बाऊन्स इन्फिनिटी सिंगल कलर टोन ऑप्शनमध्ये सादर करण्यात आली आहे. यात टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, सिंगल डिस्क ब्रेक आणि ड्युअल सस्पेंशन मिळेल. तसेच ब्लूटूथ आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह अनेक लेटेस्ट फाचर्स यामध्ये पाहता येतील.

Bounce Infinity Electric Scooter
Flipkart वरुन औषधे मिळणार घरपोच! सुरु केली ऑनलाईन फार्मसी

किंमत काय असेल?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाऊन्स इन्फिनिटी इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत विविध प्रकारच्या बॅटरी ऑप्शन्ससह सादर केली जाईल, ज्याची किंमत स्वॅप करता येईल अशा बॅटरी ऑप्शनसाठी सुमारे 50,000 रुपये आणि सामान्य बॅटरी ऑप्शनसाठी सुमारे 70,000 रुपये असू शकते. भारतात, Bounce इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1, Ola S1 Pro, Ather 450X, TVS iQube, बजाज चेतक इलेक्ट्रिक सारख्या चांगल्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर तसेच Hero Electric, Komaki, Okaya यांसारख्या इतर कंपन्यांच्या स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल.

Bounce Infinity Electric Scooter
Hyundai ची Ionic 5 इलेक्ट्रिक SUV; सिंगल चार्जवर धावेल 481 किमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()