Mobile Charging : मोबाईल चार्ज करताना एकच चूक भोवली, गर्भवती तरुणीचा दुर्दैवी मृत्यू! पोटातील बाळही दगावलं

Brazil News : ही दुर्घटना घडली तेव्हा जेनिफर नऊ महिन्यांची गर्भवती होती.
Mobile Charging
Mobile ChargingeSakal
Updated on

Accident News : स्मार्टफोनचा स्फोट होऊन झालेल्या कित्येक दुर्घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र आता ब्राझीलमधून एक दुर्दैवी आणि तितकीच भयावह घटना समोर आली आहे. आपला मोबाईल चार्ज करताना वीजेचा धक्का बसून एका गर्भवती तरुणीचा मृत्यू झाला आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जेनिफर कॅरॉलाईन असं या तरुणीचं नाव होतं. ती नुकतीच बाथरुममधून अंघोळ करुन बाहेर आली होती, आणि ओल्या हातांनीच आपला फोन चार्जिंगला लावत होती. एक्स्टेंशन कॉर्डने फोन चार्जिंगला लावताना, अचानक त्यात करंट आला आणि जेनिफरला वीजेचा धक्का बसला.

Mobile Charging
Smartphone Tips : फोन चार्जिंग करण्याची योग्य वेळ कोणती? याचं उत्तर तुम्हाला माहिती असायलाच हवं?

वीजेचा धक्का बसल्यानंतर जेनिफर मोठ्याने ओरडली. तिचा आवाज ऐकून तिचा पती धावत आतमध्ये आला. जेनिपर यावेळी जमीनीवर पडून होती. तिच्या पतीने तातडीने वैद्यकीय मदत मागवली. मात्र, जेनिफरचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलं.

बाळही दगावलं

ही दुर्घटना घडली तेव्हा जेनिफर नऊ महिन्यांची गर्भवती होती. जेनिफर सोबतच तिच्या बाळाचाही मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. यामुळे तिच्या पतीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Mobile Charging
Mobile Charging Tips : केवळ फोनच नाही, तर चार्जरमध्येही लागू शकते आग; अशी घ्या खबरदारी!

खबरदारी गरजेची

स्मार्टफोन ही आज एक अगदी गरजेची वस्तू झाली आहे. मात्र, याचा वापर करताना योग्य खबरदारी घेणं गरजेचं आहे. मोबाईल किंवा कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट हे ओल्या हाताने हाताळू नयेत. तसेच, फोनला चार्जिंगला लावताना देखील विशेष काळजी घ्यावी.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.