BSNL Towers : पुन्हा सुरु झालं BSNLचं युग! देशभरात १५ हजार नवे टॉवर्स,मिळणार सुपरफास्ट 4G आणि 5G नेटवर्क

BSNL Network : बीएसएनएलने आतापर्यंत 15 हजारांहून अधिक 4G साइट्स सक्रिय केल्या आहेत. 'आत्मनिर्भर भारत' या मोहिमेअंतर्गत उभारलेल्या या साइट्समुळे देशभरात नेटवर्क कव्हरेज वाढेल.(BSNL 4G Nationwide Service on 15,000 Towers, 5G Testing Begins)
BSNL 4G Nationwide Service on 15,000 Towers, 5G Testing Begins
BSNL 4G Nationwide Service on 15,000 Towers, 5G Testing Beginsesakal
Updated on

BSNL Network in India : भारतातील खाजगी नेटवर्क कंपन्यांनी 3 जुलैला त्यांच्या रिचार्ज दरांमध्ये मोठी वाढ केली होती. त्यामध्ये एअरटेल,जिओ आणि वोडाफोन आयडिया म्हणजेच vi यांचा समावेश होता. या दरवाढीमुळे ग्राहक वर्ग प्रचंड नाराज आहे. अनेक ग्राहक अन्य स्वस्त रिचार्ज प्लान असलेल्या नेटवर्क कडे वळत आहेत.अशात देशभरात उच्च गती इंटरनेट पोहोचवण्याच्या दिशेनं महत्त्वाची पाऊलं उचलत बीएसएनएलनं आपल्या 4G सेवांची सुरुवात केली आहे. या सरकारी दूरसंचार कंपनीच्या या निर्णयामुळे देशभरात सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहे.

बीएसएनएलने आतापर्यंत 15 हजारांहून अधिक 4G साइट्स सक्रिय केल्या आहेत. 'आत्मनिर्भर भारत' या मोहिमेअंतर्गत उभारलेल्या या साइट्समुळे देशभरात नेटवर्क कव्हरेज वाढेल. या सर्व साइट्समध्ये भारतातच तयार केलेले उपकरणे वापरण्यात आली आहेत, यामुळे बीएसएनएलच्या 4G सेवा पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहेत.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बीएसएनएलच्या 4G सेवांच्या देशव्यापी लाँच वेळापत्रक जाहीर केला आहे. त्याचबरोबर बीएसएनएलच्या 5G सेवांच्या सुरुवातीच्या अपेक्षित कालावधीचीही माहिती दिली.

BSNL 4G Nationwide Service on 15,000 Towers, 5G Testing Begins
BSNL Network Check : तुमच्या एरियामध्ये बीएसएनएल नेटवर्कचं टॉवर आहे काय? एका क्लिकवर जाणून घ्या

ऑक्टोबरच्या अखेरीपर्यंत 80 हजार टॉवर आणि मार्चपर्यंत उर्वरित 21 हजार टॉवर अशा एकूण एक लाख टॉवर 4G नेटवर्कसाठी मार्च 2025 पर्यंत तयार होतील. या विस्तारामुळे जलद डाऊनलोडिंग आणि सुधारित टीव्ही स्ट्रीमिंग होईल, असेही त्यांनी सांगितले.

4G च्या सोबतच बीएसएनएलने 5G च्या चाचण्याही सुरू केल्या आहेत. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बीएसएनएलच्या स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित 5G नेटवर्कचा वापर करून व्हिडिओ कॉल केला. यामुळे बीएसएनएलच्या येणाऱ्या 5G सेवेची उत्सुकता वाढली आहे.

BSNL 4G Nationwide Service on 15,000 Towers, 5G Testing Begins
BSNL Sim Card Online : घरबसल्या 90 मिनिटात मिळणार BSNL 4G आणि 5G सिमकार्ड; जाणून घ्या ऑनलाईन ऑर्डरची सोपी प्रक्रिया

बीएसएनएलला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि नेटवर्क सुधारण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षीच्या बजेटमध्ये 83 हजार कोटी रुपयांहून अधिकची तरतूद केली आहे. यामुळे बीएसएनएलच्या नेटवर्कचे सुधारणे आणि सेवा दर्जा वाढणार आहे.

बीएसएनएलच्या या महत्वकांक्षी पावलांमुळे देशातील दूरसंचार क्षेत्रात नक्कीच क्रांती होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.