शासन बीएसएनएल कंपनीमार्फत ग्राहकांना कमीत कमी दरामध्ये चांगली सेवा देत आहे. खासगी कंपन्या स्वतःचा लाभ पाहत असतात. त्यामुळे त्यांचे दर वाढताच बहुतांश ग्राहक ‘बीएसएनएल’कडे वळू लागला आहे.
इस्लामपूर : खासगी मोबाईल कंपन्यांनी (Private Mobile Companies) मोबाईलचे रिचार्ज (Mobile Recharge) दर वाढवल्याने बहुतांश ग्राहक हळूहळू ‘बीएसएनएल’कडे वळू लागले आहे. त्यामुळे पुन्हा शासनाच्या बीएसएनएल कंपनीला चांगले दिवस येणार, असे चित्र सर्वत्र उमटू लागले आहे.