ब्रॉडबँड घ्या 600 रुपये वाचवा; BSNL ची खास याेजना

Bharat Fibre
Bharat Fibre
Updated on

सातारा : भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) नुकतीच भारत फायबर ग्राहकांसाठी नवीन याेजना बाजारात आणली आहे. भारत फायबर (Bharat Fibre) ही बीएसएनएलची फायबर ब्रॉडबँड सेवा आहे. बीएसएनएलने (BSNL) भारत फायबर अंतर्गत त्यांच्या ब्रॉडबँड योजनांवर 600 रुपयांपर्यंत बचत (save money) हाेऊ शकते अशी याेजना आणली आहे. ही याेजना प्रायाेगित तत्वावर असल्याचे बीएसएनएलने स्पष्ट केले आहे. ही याेजना 90 दिवसांपर्यंत लागू असेल. ही याेजना विद्यमान बीएसएनएल लँडलाईन ग्राहकांसाठी असून ज्यांनी ब्रॉडबँड सुविधा घेतलेली नाही. (bsnl-landline-customers-save-upto-rupees-six-hundred-broadband-plans-now)

बीएसएनएलचा विद्यमान लँडलाईन ग्राहक ज्यांच्याकडे ब्रॉडबँड कनेक्शन नाही. जे बीएसएनएलच्या भारत फायबरच्या याेजनतेून खरेदी करणार असतील त्यांची योजनेच्या माध्यमातून 600 रुपयांपर्यंत बचत हाेऊ शकते. ही सवलत ज्या भागात कंपनी ब्रॉडबँड सेवा पुरवते अशा सर्व भागात परिमंडळांतील ग्राहकांसाठी लागू आहे. प्रायाेगिक तत्वावरील याेजनेचा लाभ घेणा-या ग्राहकाला पहिल्या सहा महिन्यांकरिता भारत फायबर ब्रॉडबँड योजनेवर 100 रुपयांचा सवलत मिळेल असे नमूद करण्यात आले आहे.

Bharat Fibre
कोयनेच्या पावसात शेखर सिंह ओले चिंब; २५ पर्यटकांवर कारवाई

ग्राहकाला कंपनीकडून पहिल्या सहा महिन्यासाठी एकूण रकमेवर 100 रुपयांची सवलत मिळेल. ही याेजना तीन महिन्यांसाठी (90 दिवस) आहे. याची मुदत 12 सप्टेंबर 2021 रोजी संपेल असेही स्पष्ट करण्यात आले. या कालावधीपर्यंत, बीएसएनएलचे विद्यमान लँडलाईन वापरकर्ते कंपनीकडून फायबर-टू-होम (एफटीटीएच) योजना खरेदी करू शकतात.

BSNL
BSNL
Bharat Fibre
169 रुपयांत देशभर Unlimited बाेला, राेज मिळवा दाेन जीबी डाटा

भारत फायबर सेवा आणि त्याचा लाभ

बीएसएनएलची भारत फायबर योजना आपण आज खरेदी करू शकता. आपण भारत फायबर योजना खरेदी करण्याचा विचार करत असल्यास आपण निवडू शकता असे बरेच पर्याय आहेत. एंट्री-लेव्हल प्लॅन दरमहा 499 रुपयांचा आहे. त्यास 30 एमबीपीएसची गती आहे. याबराेबरच आणखी काही योजना आहेत ज्यांची किंमत 599 रुपये , 799 रुपये, 999 रुपये, एक हजार 277 रुपये, आणि एक हजार 499 रुपये आहे. जे अनुक्रमे 60 एमबीपीएस, 100 एमबीपीएस, 200 एमबीपीएस, 200 एमबीपीएस, आणि 300 एमबीपीएस गती देतात. त्याव्यतरिक्त 999 आणि 1,499 रुपयांच्या योजना वापरकर्त्यांसाठी डिस्ने + हॉटस्टार प्रीमियमची विनामूल्य सदस्यता देखील देत आहेत. यामध्ये चार टीबी डेटासह येणा-या 1,499 रुपयांच्या योजना वगळता सर्व योजना 3.3TB FUP डेटासह येतात असे बीएसएनएलने स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()