BSNL Network : BSNL ने नवा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे ज्याची किंमत फक्त 997 रुपयांचा आहे. हा प्लॅन तब्बल 160 दिवसांची (5 महिने) वैधता देते. याचा अर्थ तुम्हाला 5 महिन्यांसाठी रिचार्ज करण्याची झंझट नाही.
या धमाका प्लॅनमध्ये तुम्हाला रोज 2GB डाटा मिळतोय. म्हणजेच 160 दिवसांत तुम्हाला एकूण 320GB डाटा उपलब्ध होतो. इतकेच नाही तर यात दररोज 100 मोफत SMS आणि भारतातील कोणत्याही नेटवर्कवर मोफत अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग देखील समाविष्ट आहे.
फक्त कॉल आणि डाटाच नाही तर या रिचार्जमध्ये मोफत राष्ट्रीय रोमिंग आणि हार्डी गेम्स, झिंक म्युजिक आणि BSNL ट्यून सारख्या व्हॅल्यू एडेड सर्व्हिसिजंचा देखील समावेश आहे. यामुळे कनेक्टिव्हिटी आणि मनोरंजन दोन्ही गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी हा प्लॅन खूपच फायद्याचा आहे.
BSNL 15 ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे आपली 4G सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. कंपनीने आत्तापर्यंत सुमारे 25,000 4G साइट्स बसवून मोठी प्रगती केली आहे. ही सेवा अनेक ठिकाणी चाचणी टप्प्यात आली आहे आणि BSNL ने ग्राहकांना 4G सिम कार्ड्स वितरण करण्यास सुरुवात केली आहे.रिपोर्टच्यानुसार, कंपनी दिल्ली आणि मुंबईमध्ये 4G सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे, त्यानंतर लवकरच संपूर्ण देशात विस्तार करण्यात येणार आहे.
भविष्याच्या दृष्टीने, BSNL 5G सेवांच्या लाँचचीही तयारी करत आहे. यामुळे ग्राहकांना वेगवान कनेक्टिव्हिटी आणि चांगली सेवा गुणवत्ता मिळेल. टेलिकॉम क्षेत्रात होणारे बदलते स्वरूप पाहता BSNL या नवीन घडामोडींसह स्पर्धात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहे.
BSNL चा हा नवा रु. 997 चा रिचार्ज प्लॅन दीर्घकालीन वैधता आणि खर्चिक बचत करणारा डाटा आणि कॉलिंग सेवा शोधणाऱ्या वापरकर्त्यांसाठी उत्तम पर्याय आहे. येत्या काळात येणाऱ्या 4G आणि भविष्यातील 5G सेवांसह, BSNL भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांसाठी एक मजबूत पर्याय म्हणून समोर येण्याच्या तयारीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.