BSNL Mega Recharge : BSNLचा बंपर रिचार्ज प्लॅन पाहिला काय? 100 रुपयांच्या खर्चात 1 वर्षाचा पॅक; कॉलिंग,डेटा अन् वेगवेगळ्या सुविधा

BSNL Network Yearly Recharge Plan : या प्लॅनमध्ये दरमहा फक्त 100 रुपये खर्च करून तुम्ही 12 महिने सर्व सुविधाचा आनंद घेऊ शकता.
BSNL Network Yearly Recharge Plan
BSNL Network Yearly Recharge Planesakal
Updated on

BSNL Recharge Plans : BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एकदा धमाकेदार ऑफर जाहीर केली आहे. आता फक्त 100 रुपये मासिक खर्चात तुम्ही 1 वर्षाची वैधता असलेला रिचार्ज प्लॅन घेऊ शकता. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला खाजगी नेटवर्क कंपन्यांनी मोबाईल रीचार्जचे दर वाढवल्यानंतर ग्राहकांचा कल बीएसएनएलकडे वाढत आहे. कारण बीएसएनएल अगदी कमी दरामध्ये वेगवेगळे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करून दिले आहेत.

या प्लॅनमध्ये काय आहे खास?

फक्त 1198 रुपये खर्च: या प्लॅनची किंमत फक्त 1198 रुपये आहे. म्हणजेच, दरमहा फक्त 100 रुपये खर्च करून तुम्ही 12 महिने सर्व सुविधाचा आनंद घेऊ शकता.

अनलिमिटेड कॉलिंग: या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.

3GB डेटा: या प्लॅनमध्ये तुम्हाला दर महिन्याला 3GB डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर 80 kbps स्पीड मिळते.

30 SMS : दरमहा तुम्हाला 30 एसएमएस मोफत मिळतात.

365 दिवसांची वैधता: या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. म्हणजेच, तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करण्याची गरज नाही.

BSNL Network Yearly Recharge Plan
BSNL Network Check : तुमच्या एरियामध्ये BSNL ला रेंज आहे की नाही? सिमकार्ड घेण्यापूर्वीच असं चेक करा नेटवर्क स्टेटस

हा प्लॅन इतका लोकप्रिय का आहे?

कमी बजेट: ज्यांचे बजेट कमी आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन खूपच उपयुक्त आहे.

सर्व सुविधा: या प्लॅनमध्ये तुम्हाला कॉलिंग, डेटा आणि एसएमएस या सर्व सुविधा मिळतात.

दीर्घकाळची वैधता: 1 वर्षाची वैधता असल्यामुळे तुम्हाला बार-बार रिचार्ज करण्याची गरज नाही.

BSNL Network Yearly Recharge Plan
BSNL New Sim Card : घरबसल्या मोबाईलवरून सुरु करा नवीन BSNL सिमकार्ड; काय आहे सोपी प्रोसेस? वाचा एका क्लिकवर

हा रिचार्ज प्लॅन घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या BSNL स्टोरवर जाऊ शकता किंवा ऑनलाइन रिचार्ज करू शकता.

बीएसएनएलचा हा नवा रिचार्ज प्लॅन खरोखरच आकर्षक आहे. जर तुम्ही BSNLचे ग्राहक असाल आणि कमी बजेटमध्ये सर्व सुविधा मिळवण्याची इच्छा असते, तर हा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.