BSNL 5G Public Trials
BSNL 5G Public Trialsesakal

BSNL 5G : भारतात BSNL 5G नेटवर्कची चाचणी झाली यशस्वी, खाजगी कंपन्यांना बसणार मोठा फटका?

BSNL 5G Network Testing : बीएसएनएलने 5G नेटवर्कच्या स्पर्धेमध्ये आता प्रवेश केला आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL लवकरच भारतात 5G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे.
Published on

BSNL Network Update : खाजगी मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी मोबाईल रिचार्जचे दर वाढवल्याने ग्राहक वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. महिन्याच्या सुरुवातीस रिचार्ज दरांमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली.याचा थेट परिणाम मोबाईल वापरकर्त्यांवर झाला यासाठी पर्याय म्हणून मोबाईल वापरकर्त्यांनी आपले मोबाईल नेटवर्क अन्य स्वस्त नेटवर्कमध्ये स्विच करण्याचे प्रमाण वाढवले आहे.

या सर्व बाबी लक्षात घेता बीएसएनएलने 5G नेटवर्कच्या स्पर्धेमध्ये आता प्रवेश केला आहे. बीएसएनएल 4G नेटवर्क देत आहे. काही ग्राहकांनी मोबाईल रिचार्जमध्ये झालेल्या दरवाढीनंतर बीएसएनएल मध्ये कार्ड पोर्ट करून घेतले.पण ज्या ग्राहकांना 5G नेटवर्क पाहिजे असल्याने काही ग्राहकांनी आहे त्या खाजगी नेटवर्कमध्येच समाधान मानले.

भारतातील दूरसंचार क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण बदल घडत आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL लवकरच भारतात 5G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. एका देशी स्टार्टअपसोबत हातमिळून, BSNL देशभरातील विविध शहरांमध्ये 5G सेवा परीक्षणाच्या अंतिम टप्प्यात आहे.

केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या 5g नेटवर्कची यशस्वी चाचणी केली. त्यांनी बीएसएनएल 5g नेटवर्क वापरून व्हिडिओ कॉलवर संवाद साधला.सिंधिया यांनी x वर व्हिडिओ शेअर केला आहे.

BSNL 5G Public Trials
BSNL Network Check : तुमच्या एरियामध्ये बीएसएनएल नेटवर्कचं टॉवर आहे काय? एका क्लिकवर जाणून घ्या

या तीन महिन्यांच्या परीक्षण कालावधीत मुख्यत्वे अनधिकृत नेटवर्क्सवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. दिल्लीत कनॉट प्लेस, संचार भवन, जेएनयू कॅम्पस, आयआयटी, आणि इंडिया हॅबिटॅट सेंटर यांसारख्या ठिकाणी, बंगलोरमध्ये सरकारी कार्यालये आणि इनडोर कार्यालये, तसेच गुडगावमधील निवडक ठिकाणे आणि हैदराबादमधील आयआयटीमध्ये परीक्षण केले जाणार आहे.

BSNL 5G Public Trials
BSNL Recharge Plans : बीएसएनएलचे अनलिमिटेड रीचार्ज 18 रुपयांपासून सुरू; सर्वात स्वस्त रीचार्ज प्लॅन्स झाले लॉन्च,तुम्ही पाहिले काय?

BSNLच्या 700MHz बँडसह सेवा

BSNLच्या 700MHz बँडसह सुरुवातीला या परीक्षण क्षेत्रात सेवा पुरविली जाईल. तसेच, BSNL जनतेसाठी 5G सेवा परीक्षण देण्यासाठी देखील सज्ज आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), तेजस नेटवर्क, व्हीएनएल, कोरल टेलिकॉम, एचएफसीएल यांसारख्या सदस्य कंपन्यांचा समावेश असलेल्या VoICE या संघटनेने BSNLसोबत याबाबत बैठक घेतली आहे.

BSNLची पायाभूत सुविधा

या परीक्षणासाठी BSNL स्पेक्ट्रम, टॉवर्स, बॅटरीज, वीज पुरवठा आणि अन्य पायाभूत सुविधा पुरविणार आहे. BSNLच्या या उपक्रमामुळे देशातील 5G सेवा लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

BSNL 5G Public Trials
Amazon Prime Free : ॲमेझॉन प्राईमवर पैसे खर्च न करता एंटरटेनमेंट हवंय? फ्रीमध्ये मिळणार सबस्क्रिप्शन, वापरा 'या' स्मार्ट ट्रिक्स

BSNLचा हा उपक्रम भारतातील दूरसंचार क्षेत्रात एक नवीन युगाचा प्रारंभ करणारा ठरणार आहे. 5G सेवामुळे देशातील डिजिटल क्रांतीला चालना मिळणार असून, उच्च वेगाचे इंटरनेट, नवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि देशाच्या आर्थिक वाढीस मोठा हातभार लागणार आहे.

बीएसएनएलच्या 5G नेटवर्क सेवेमुळे अनेक क्षेत्रांमध्ये बदल घडू शकतात. त्यामध्ये टेलिकॉम क्षेत्र याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडेल. बीएसएनएलच्या या निर्णयाने देशातील इतर खाजगी टेलिकॉम कंपन्यांवर मोठा परिणाम होण्याचे दिसत आहे. कारण बीएसएनएलची 5G सेवा सुरू झाल्यानंतर मोजताना न येण्याच्या आकड्यातील वापरकर्ते बीएसएनएलवर आपले नेटवर्क स्विच करण्याची शक्यता आहे. बीएसएनएलची ही 5G सेवा अन्य खाजगी नेटवर्कच्या तुलनेने स्वस्त असू शकते. त्यामुळे देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.