Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Bumble App Feature : महिलांना या डेटिंग साईटवर अधिक सुरक्षित वाटावं यासाठी बम्बलने कित्येक फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत.
Bumble Prompt
Bumble PrompteSakal
Updated on

Bumble Men First Move : बम्बल हे डेटिंग अ‍ॅप जगभरात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. महिलांना या अ‍ॅपवर सुरक्षित वाटावं यासाठी बम्बलने बऱ्याच खास सेटिंग्स दिल्या आहेत. मात्र यामुळे आपल्यावर अधिक प्रेशर येत असल्याची तक्रार महिलांनी केली होती. यामुळे आता बम्बलने खास पुरूषांसाठी एका सेटिंगमध्ये बदल केला आहे.

बम्बल अ‍ॅपवर असणाऱ्या एका खास फीचरमुळे पुरूष हे महिलांना पहिला मेसेज करू शकत नाहीत. कोणीही महिलांचा इनबॉक्स स्पॅम करू नये यासाठी हे फीचर देण्यात आलं आहे. मात्र, या फीचरमुळे आपल्यावर संवाद सुरू करण्याचं प्रेशर येत असल्याची तक्रार कित्येक महिलांनी केली होती. यामुळे आता त्यांना काहीसा दिलासा देण्यात आला आहे.

कसं काम करेल फीचर?

या फीचरमुळे आता महिला आपल्या प्रोफाईलवर काही "ओपनिंग मूव्ह प्रॉम्प्ट" ठेऊ शकतात. यावर पुरूष हे आकर्षक रिप्लाय देऊन संवादाची सुरुवात करू शकतील. यामुळे आईस-ब्रेक करण्याचा जो दबाव महिलांवर होता, तो कमी होणार आहे.

Bumble Prompt
Bumble Fake Account : ऑनलाईन डेटिंग होणार अधिक सुरक्षित! फेक, स्पॅम प्रोफाईल हटवण्यासाठी बम्बल घेतंय एआयची मदत..

कसे असणार प्रॉम्प्ट?

या प्रॉम्प्ट्समध्ये काही हलके-फुलके प्रश्न असतील. "तुम्हाला माझ्या प्रोफाईलमध्ये काय आवडलं?", "तुमचं आवडतं पुस्तक कोणतं?" असे काही डीफॉल्ट प्रॉम्प्ट उपलब्ध असतील. यासोबतच, महिला आपल्या आवडीचे प्रश्न देखील यामध्ये अपडेट करू शकतील.

कालांतराने एकच प्रश्न बोअर होऊ शकतो, हे लक्षात घेऊन कंपनी "डायनॅमिक मूव्ह" या फीचरवर देखील काम करत आहे. यामुळे ठराविक कालावधीनंतर हे प्रश्न बदलता येणार आहेत.

Bumble Prompt
Scammer WhatsApp Chat : कशी होते ऑनलाईन फसवणूक? स्कॅमरने स्वतःच सांगितली पद्धत; व्हॉट्सअ‍ॅप चॅट होतंय व्हायरल

पुरूषांना काय होणार फायदा?

बम्बलवर आतापर्यंत एखाद्या प्रोफाईलसोबत मॅच झाल्यानंतर देखील महिलेने स्वतःहून मेसेज केल्याशिवाय पुरूषांना तिला मेसेज करता येत नव्हता. मात्र, या अपडेटनंतर आता पुरूषांना कमीत कमी आईस ब्रेक करण्याची संधी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.