Bumble Dating Update : ऑनलाईन डेटींगमध्ये सुरक्षा ही सर्वात महत्वाची बाब असते. आता या सुरक्षेमध्ये आणखी भर पडणार आहे. कारण, लोकप्रिय डेटिंग अॅप बम्बलने भारतात त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन सुरक्षा अपडेट आणले आहे. या अपडेटद्वारे युजर्स आता AI चा वापर करून बनवलेले फोटो आणि व्हिडीओ असलेले प्रोफाइल यांच्यावर रिपोर्ट करू शकता.
डेटिंगच्या जगात तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना, बम्बल हा बनावट वापर रोखण्यासाठी आणि AI चा जबाबदार वापर सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, "हे अपडेट बम्बलच्या मिशनचा एक भाग आहे. ज्यामध्ये निरोगी आणि समान संधी असलेले संबंध निर्माण करणे आणि महिलांना या अनुभवाच्या केंद्रस्थानी ठेवणे याचा समावेश आहे."
या नवीन रिपोर्टिंग पर्याया व्यतिरिक्त, ऑनलाईन डेटींगमध्ये सदस्यांची सुरक्षा राखण्यासाठी AI चा चांगल्या हेतूने वापर करणारी अशी बम्बलवर आधीपासूनच वैशिष्ट्ये आहेत.
फसवेगिरीचा शोध (Deception Detector): हे टूल स्पॅम, स्कॅम आणि बनावट प्रोफाइल्स ओळखण्यास मदत करते. यावर्षाच्या सुरुवातीला लॉन्च झाल्यापासून, सदस्यांनी अशा समस्यांची रिपोर्ट करण्याचे प्रमाण 45 टक्क्यांनी कमी झाले आहे.
प्रायवेट डिटेक्टर (Private Detector): बम्बलच्या चॅटद्वारे जर कोणी अयोग्य फोटो पाठवण्याचा प्रयत्न करत असेल, तर हे टूल ते स्वयंचलितपणे ब्लर करते आणि तुम्हाला चेतावणी देते. त्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला ब्लॉक करू शकता किंवा फोटो रिपोर्ट करू शकता.
तुमच्यासाठी (For You) फीचर: बम्बलने त्यांच्या "For You" फीचरमध्येही AI चा समावेश केला आहे. आता ते तुमच्या आवडीनुसार आणि मागील मॅचवर आधारित दररोज चार प्रोफाइल्स दाखवते जेणेकरून तुम्हाला तुमच्या आवडीच्या व्यक्तींशी जुळवून आणता येईल.
या अपडेट्सचा उद्देश अॅप वापरताना युजरचा अनुभव चांगला करणे आणि सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे.
अलीकडील बम्बलच्या सर्वेक्षणातून हेही समोर आले आहे की, 71 टक्के Gen-Z आणि Millennial युजर्स असे मानतात की, डेटिंग अॅपवर AI जनरेटेड फोटो आणि बायोचा वापर मर्यादित असायला हवा. इतकेच नाही तर, 71 टक्के लोकांचे असे मत आहे की, ज्या व्यक्तींनी AI चा वापर करून कधी न केलेल्या गोष्टी केल्यासारखे किंवा न गेलेल्या ठिकाणी गेल्यासारखे फोटो तयार करतात ते ऑनलाईन फसवणूक (Catfishing) करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.