Global Warming : ग्लोबल वॉर्मिंगमुळे हरवतंय फुलपाखरांचं सौंदर्य.. संशोधनात धक्कादायक बाब उघड!

युनिवर्सिटी ऑफ एक्सेटरमध्ये याबाबत संशोधन झालं. संशोधकांनी मैदानी प्रदेशात आढळणाऱ्या चॉकलेटी रंगाच्या फुलपाखरांचा अभ्यास करून हा निष्कर्ष सादर केला.
Global Warming
Global WarmingeSakal
Updated on

Global Warming effect on Butterflies : ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजेच जागतिक तापमानवाढीमुळे कित्येक दुष्परिणाम होत असल्याचं आपल्याला माहितीच आहे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळणे, समुद्राच्या पातळीत वाढ होणे अशा गोष्टी यामुळे होत आहेत. मात्र, ग्लोबल वॉर्मिंगमुळे फुलपाखरांचं सौंदर्य देखील हरवत चालल्याची बाब एका संशोधनात उघड झाली आहे.

युनिवर्सिटी ऑफ एक्सेटरमध्ये याबाबत संशोधन झालं. संशोधकांनी मैदानी प्रदेशात आढळणाऱ्या चॉकलेटी रंगाच्या फुलपाखरांचा अभ्यास करून हा निष्कर्ष सादर केला. मॅनिओला जुर्टिना असं या फुलपाखरांच्या प्रजातीचं वैज्ञानिक नाव आहे. त्यांना मेडो ब्राऊन (Meadow Brown) नावानेही ओळखलं जातं. या फुलपाखरांच्या पंखांवर काळ्या-पांढऱ्या रंगाचे डोळ्याप्रमाणे दिसणारे स्पॉट (Eyespots) असतात.

संशोधकांनी सांगितलं, की ज्या फुलपाखरांची वाढ ही साधारणपणे 11 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये झाली आहे, त्यांच्या पंखांवर सरासरी सहा आयस्पॉट दिसून आले. मात्र, ज्यांची वाढ 15 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये झाली आहे, त्यांच्या पंखांवर सरासरी तीनच आयस्पॉट दिसून आले. (Temperature effect on Butterfly eyespots)

Global Warming
Microplastic in Water Bottle : प्लास्टिकच्या बाटलीत खरंच दडलेत 2.5 लाख राक्षस? सनसनाटी संशोधनामागचं शास्त्रीय तथ्य

आयस्पॉटचं महत्त्व

सेंटर फॉर इकॉलॉजी अँड कंझर्व्हेशनमधील संशोधक, प्रा. रिचर्ड फ्रेंच कॉन्स्टेंट यांनी सांगितलं, की मेडो ब्राऊन फुलपाखराच्या पंखांवर असलेल्या आयस्पॉटमुळे त्यांचं संरक्षण होतं. हे स्पॉट मोठ्या डोळ्यांसारखे दिसत असल्यामुळे या फुलपाखरांची शिकार करण्यापूर्वी दुसरा प्राणी थोडा विचार करतो. तसंच, हे स्पॉट झाडा-झुडपांमध्ये कॅमोफ्लॉजप्रमाणे देखील काम करतात.

आयस्पॉट कमी होण्याचं कारण

निसर्ग प्रत्येक प्राण्याला एक इनबिल्ट सेफ्टी फीचर देत असतं. या फुलपाखरांमध्येही हे आयस्पॉट म्हणजे सेफ्टी फीचरच आहे. उष्ण भागातील फुलपाखरांच्या पंखांवर कमी आयस्पॉट असल्यामुळे वाळलेल्या गवताळ प्रदेशात, किंवा वाळलेल्या झाडांवर ही फुलपाखरं शिकारी प्राण्यांना पटकन ओळखू येत नाहीत. त्या वातावरणात राहण्यासाठी या फुलपाखरांमध्ये झालेली ही उत्क्रांतीच म्हणता येईल.

Global Warming
Scientists Talk To Whale : शास्त्रज्ञांनी चक्क व्हेलशी मारल्या गप्पा; आता एलियन्सशी संवाद साधताना होणार संशोधनाचा फायदा

मात्र, ही प्रक्रिया नैसर्गिक वाटत असली तरी त्याला ग्लोबल वॉर्मिंग मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. जागतिक तापमान मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे, इतर प्राण्यांना पृथ्वीवर टिकण्यासाठी आपल्यामध्ये बदल घडवून आणावे लागत असल्याचा हा स्पष्ट पुरावा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.