Electric Scooter : दिवाळीला खरेदी करा 'या' टाॅप इलेक्ट्रिक स्कूटर्स

भारतात विक्री होणाऱ्या सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर्स
TVS iQube Electric Scooter
TVS iQube Electric Scooteresakal
Updated on

देशात पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे तुम्ही या दिवाळीला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी उपयोगाची आहे. या स्कूटर्स भारतात विक्री होणाऱ्या सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर्स आहेत. ती सिंगल चार्जमध्ये चांगले रेंज देण्याबरोबरच कैक नवीन फिचर्सही देतात. तर चला जाणून घेऊया स्कूटर्सच्या किंमती आणि स्पेसिफिकेशनविषयी... (Electric Scooter)

टीव्हीएस आयक्यूब

टीव्हीएस कंपनीची ही बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर मानली जाते. तिच्या स्पेसिफिकेशनविषयी बोलाल तर ती पांच तासांमध्ये पूर्ण चार्ज होते. चार्ज झाल्यानंतर ती ७५ किलोमीटरपर्यंत धावते. स्कूटर ७८ किलोमीटर वेगाने धावते. तिचे अॅसेलरेशन (०-६०) ९.६५sआहे. मोटर पाॅवर ४.४ kw बरोबर येते. TVS iQube १२ इंच के अलाॅय व्हिल्सवर चालते. टीव्हीएस आयक्यूबमध्ये ड्युअल-टोन बाॅडीबरोबर एक फ्रंट अप्राॅन, चौकोनी आकाराचे आरसे, एक ब्लूटूथ सक्षम डिजिटल इन्स्ट्रुमेंट कंसोल आणि एक ऑल एलईडी लायटींग सेटअप आहे. स्कूटरची किंमत एक लाख आहे.

Bajaj Chetak Electric Scooter
Bajaj Chetak Electric Scooteresakal
TVS iQube Electric Scooter
Oppoचा दमदार स्मार्टफोन लवकरच होणार लाँच, फोटोज अन् फिचर्स लीक

बजाज चेतक

बजाज चेतक फुल एलईडी लायटिंग सेटअपसह मिळते. भारतात तिची किंमत एक लाखांपासून १.१५ लाखांपर्यंत आहे. चेतक सिंगल चार्जमध्ये ९५ किमीपर्यंत रेंज देते. तिची बॅटरी क्षमता ४८ व्ही, ६०.३ एएचच्या बरोबर येते. ती ७० किलोमीटर प्रतितास या वेगाने धावते. यात तीन वर्ष बॅटरी वाॅरंटीही आहे. या स्कूटरचे मोटर पाॅवर ४०८० डब्ल्यू देण्यात आले आहे. बजाज चेतकमध्ये एक गोल हेडलॅम्प, एक इंडिकेटर-माऊंटेड फ्रंट एप्राॅन , एक फुटबोर्ड आणि १२ इंचाचे अलाॅय व्हिल आहे. या स्कूटरमध्ये एक ब्रेकिंग सिस्टिम, स्पर्श-संवेदनशील स्विच आणि अग्रणी-लिंक फ्रंट सस्पेन्शनही मिळते.

सिंपल वन

सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ७.० इंचाचे फुल कलर टचस्क्रिन मिळते. सिंपल वन या वर्षी भारतात आगमन झाले आहे. हे एक त्रिकोणीय फ्रंट एप्राॅन, एक फ्लॅट प्रकारचे सीट आणि ३० लीटर अंडरसीट क्षमता व चांगल्या डिझाईनबरोबर येते. ही भारताती सर्वाधिक रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. जी सिंगल चार्जवर २३६ किलोमीटरपर्यंत धावते. ई-स्कूटरचे टाॅप स्पीड १०५ प्रति किलोमीटर तासाने वेगाने धावते. तिची बॅटरी क्षमता ४.८ केडब्ल्यूएच आहे, जे १ तास ५ मिनिटांत चार्ज होते. या स्कूटरची भारतात किंमत एक लाख नऊ हजार रुपये आहे.

ओला एसा प्रो

या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत १.१ लाख रुपये आहे. ओला एसा प्रो दोन्ही चाकांसह डिस्क ब्रेकबरोबर येते. ओला एसा प्रो कंपनीची पहिले इलेक्ट्रिक वाहन आहे. ती १० विविध रंगात उपलब्ध आहे. यात एक स्माईली आकाराचे हेडलॅम्प, एक साधा फ्रंट एप्राॅन, ब्लूटूथ आणि वायफायसह ७.० इंच टचस्क्रीन कंसोल आणि १२ इंच मिश्र धातू चाके आहेत. तसे ८.५ केडब्ल्यूची इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे. तिची टाॅप स्पीड ११५ केएम प्रतितास आणि रेंज १८१ केएमपर्यंत आहे.

एथर ४५० एक्स

या स्कूटरची किंमत १.१३ लाखांपासून सुरु होते. एथर ४५० बाय १२ इंचाचे अलाॅय व्हिल्सवर धावते. एथर ४५० बाय त्रिकोणीय आरसे, एक फ्लॅट आकाराचे सीट, एक पूर्ण एलईडी प्रकाश व्यवस्थेसह बनवली आहे. तिचे वजन १०८ किलोग्रॅम आहे. ती २.९ केडब्ल्यूएचच्या बॅटरी बरोबर ६केडब्ल्यू मोटरसह येते. ही इलेक्ट्रिक स्कूटर ८५ केएम रेंज सिंगल चार्जवर चालते आणि ८० प्रतितास वेगाने धावते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.