BYD Seal Price in India : चिनी इलेक्ट्रिक कार कंपनी BYD ने भारतात आपली सील ही इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. या कारला ऑटो एक्स्पो 2023 मध्ये सादर करण्यात आलं होतं. ही सेडान कार टेस्लाच्या गाड्यांप्रमाणे अगदीच स्टायलिश आहे. तसंच याची रेंजही अगदी तगडी आहे. 27 फेब्रुवारीपासूनच याची एडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात आली होती.
या कारची रेंज तब्बल 650 किलोमीटर प्रतिचार्ज एवढी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही रेंज टॉप व्हेरियंटची असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं. 15 मिनिटांच्या चार्जमध्ये ही कार 200 किलोमीटर धावू शकते. यासोबतच बॅटरीची टेक्नॉलॉजी एवढी खास आहे, की आपली कार आयुष्यात 1 मिलियन किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करू शकेल असा दावा BYD कंपनीने केला आहे.
या कारचे तीन व्हेरियंट लाँच करण्यात आले आहेत. याच्या डायनॅमिक व्हेरियंटची रेंज एका चार्जमध्ये 510 किलोमीटर एवढी आहे. याच्या बेस व्हेरियंटची किंमत 41 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
प्रीमियम व्हेरियंटची रेंज ही 650 किलोमीटर एवढी आहे. याच्या बेस व्हेरियंटची किंमत 45,55,000 रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे. तर या कारच्या परफॉर्मन्स व्हेरियंटची रेंज 580 किलोमीटर प्रतिचार्ज एवढी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याच्या बेस व्हेरियंटची किंमत 53 लाख रुपयांपासून सुरू होते. या सर्व किंमती एक्स शोरूम आहेत.
या सेडान कारचं डिझाईन हे बीवायडीच्या ओशन X कन्सेप्टवरुन प्रेरित आहे. यामध्ये ऑल-ग्लास रुफ, फ्लश-फिटिं डोअर हँडल्स, बूमररँग आकाराच्या चार LED लाईट्स (डेटाईम रनिंग), स्प्लिट हेडलँप डिझाईन आणि मागच्या बाजूला फुल-विड्थ LED लाईट बार देण्यात आला आहे. या गाडीला 5 स्टार NCAP सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. या कारमध्ये 9 एअरबॅग्स देण्यात येतात.
या कारच्या डायनॅमिक व्हर्जनमध्ये 61.4 किलोवॅट बॅटरी देण्यात आली आहे. प्रीमियम रेंजमध्ये 82.5 किलोवॅट तर परफॉर्मन्स रेंजमध्ये देखील 82.5 किलोवॅट बॅटरी देण्यात आली आहे. एंट्री लेव्हल आणि मिड स्पेक डायनॅमिक आणि प्रीमियम रेंज अशा दोन्ही व्हेरियंटमध्ये सिंगल मोटर, रिअर व्हील ड्राईव्ह सेटअप मिळेल. तर परफॉर्मन्स व्हेरियंटमध्ये ड्युअल मोटर, ऑल व्हील ड्राईव्ह पर्याय मिळणार आहे.
या कारसोबत 150KW क्षमतेचा डीसी चार्जर मिळणार आहे. या चार्जरच्या मदतीने अवघ्या 26 मिनिटांमध्ये BYD Seal ही कार 30 ते 80 टक्के चार्ज केली जाऊ शकते. यासोबतच 11KW क्षमतेचा एक AC चार्जरही देण्यात येणार आहे, ज्यामुळे ही कार घरीदेखील चार्ज करू शकता.
या कारमध्ये अत्याधुनिक असा BYD e-Platform 3.0 देण्यात आला आहे. इलेक्ट्रिक गाड्यांसाठी विशेष असा हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. सोबतच यामध्ये 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 15.6 इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, वायरलेस Apple CarPlay आणि अँड्रॉईड ऑटो, हीटेड अँड व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॅनारोमिक सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा, ऑटोमेटेड क्लायमेट कंट्रोल, ADAS आणि वायरलेस चार्जिंग पॅड्स असे कित्येक फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.