iPhone New Feature : आयफोन वापरण्याचा तुमचा अनुभव बदलून टाकणारे एक जबरदस्त अपडेट आले आहे. अॅपलने नुकत्याच iOS 18.1 चा बीटा व्हर्जन निवडक वापरकर्त्यांसाठी रिलीज केला आहे. या अपडेटमध्ये सर्वात आकर्षक आणि उपयुक्त असलेली सुविधा म्हणजे 'कॉल रेकॉर्डिंग आणि ट्रान्सक्रिप्शन' (Call Recording and Transcription) आहे.
या फीचरमुळे आता तुम्ही तुमच्या फोनवरुन होणाऱ्या महत्त्वाचे कॉल रेकॉर्ड करू शकता आणि त्याचबरोबर त्यांचे लेखी रूपांतर (ट्रान्सक्रिप्ट) देखील मिळवू शकता. आता तुम्हाला मीटिंग, इंट्युव्ह्यू किंवा कोणत्याही वैयक्तिक संभाषणातील महत्त्वाच्या मुद्दयांची नोंद ठेवण्याची चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या म्हणण्यानुसार हा फीचर तुमच्या आयफोनला एका नवीन लेवलवर घेऊन जाणारा ठरू शकतो.
कॉल रेकॉर्ड करणे अगदी सोपे आहे. कॉल करताना किंवा उचलल्यानंतर स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या रेकॉर्ड बटणवर टॅप करा. रेकॉर्डिंग सुरू झाल्यावर कॉलमधील सर्व सहभागींना कॉल रेकॉर्ड केला जात आहे याची सूचना मिळणार आहे. यामुळे कॉलमधील कोणत्याही व्यक्तीला गैरसमज होणार नाही याची खात्री केली जाते.
रेकॉर्डिंग सोबतच तुमचा आयफोन कॉलची रिअल टाइम ट्रान्सक्रिप्ट देखील तयार करेल. म्हणजेच, कॉल चालू असतानाच त्याचे लेखी स्वरूप तयार होत राहील. ही ट्रान्सक्रिप्ट अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीस्कर भाषेत ही ट्रान्सक्रिप्ट वाचू शकता.
या फीचरची आणखी एक खासियत म्हणजे कॉलमध्ये चर्चा झालेल्या महत्त्वाच्या मुद्दयांचा सारांश तयार करणे. यामुळे संपूर्ण रेकॉर्डिंग ऐकण्याची गरज न पडता तुम्ही कॉलचा सारांश वाचून महत्त्वाच्या गोष्टी आठवून ठेवू शकता.
कॉल रेकॉर्डिंग आणि ट्रान्सक्रिप्शनसोबतच फोन अॅपमध्ये आणखी काही अपडेट्स मिळणार आहेत. कॉल हिस्ट्रीमध्ये शोध करणे आता सोपे होईल. फोन नंबर टाइप करताना अॅप त्या नंबरचा स्वतःच अंदाज लावेल. तसेच, कॉल दरम्यान एकापेक्षा जास्त सिम वापरणाऱ्यांसाठी सिम कार्ड सहजपणे बदलण्याची सुविधाही मिळणार आहे.
यापुढे तुमच्या आयफोन 12 आणि त्यावरील मॉडेल्सवर नोट्स अॅपमध्ये देखील थेट ऑडिओ रेकॉर्डिंग आणि ट्रान्सक्रिप्ट मिळण्याची सुविधा येणार आहे. या सर्व अपडेट्समुळे तुमच्या आयफोनवर कॉल आणि नोट्स मॅनेज करणे आता अधिक सोयीस्कर होईल यात शंका नाही. सर्वसामान्य आयफोन युजर्ससाठी हे फीचर कधी उपलब्ध होईल हे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.