Car Airbags : सगळंच Airbagsच्यावर सोडून मोकळं होऊ नका, काहीवेळा Airbags उघडतच नाहीत,कारण...

तुम्ही सिटबेल्ट घातला नसेल तर Airbag उघडते का?
Car Airbags
Car Airbags esakal
Updated on

Car Airbags : चालकाच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रवाशी कारमध्ये सहा एअरबॅग्ज बंधनकारक करणार असल्याची घोषणा नुकतीच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. पण आता तो नियम बंधनकारक नसल्याचे गडकरींनी स्पष्ट केले आहे.

भारतात अपघातांची संख्या वाढलीय, त्यामुळे कार घेताना त्याच्या सेफ्टी फिचर्सचा पुरेपुर अभ्यास केला जातो. भारत सरकारने यापूर्वीच कारमध्ये 2 एअरबॅग देणे बंधनकारक केले आहे. ग्राहकही गाड्या निवडताना काळजी घेत आहेत.

एखादा अपघात किरकोळ वाटत असला तरी एअरबॅग्जमुळे चालकाचा आणि प्रवाशांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे कारच्या सुरक्षिततेमध्ये एअरबॅग्ज महत्त्वाची भूमिका बजावतात परंतु काही परिस्थितींमध्ये त्या उघडत नाहीत. चला, त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.(Not opening car airbag during car accident) 

Car Airbags
Airbags: ठरलं! 'या' तारखेपासून होणार 6 एअरबॅग्ज बंधनकारक; गडकरींची घोषणा

सीट बेल्ट न घालणे

एअरबॅग प्रभावीपणे काम करण्यासाठी ड्रायव्हर आणि प्रवाशांनी नेहमी सीट बेल्ट घालणे आवश्यक आहे. ड्रायव्हर आणि प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी एअरबॅग सीट बेल्टसह काम करतात.

सीट बेल्ट न बांधल्यास, एअरबॅग एक्टीव्ह झाले तर ड्रायव्हर किंवा प्रवाशाला गंभीर दुखापत होऊ शकते. त्यामुळेच या दोघांची System एकत्रित काम करण्यासाठी करण्यात आली आहे.

गाडीचा वेग कमी असणे

एअरबॅग सामान्यत: 20 mph किंवा त्याहून अधिक वेगाने होणाऱ्या क्रॅशमध्ये ऍक्टीव्ह होतात. कारचा वेग खूप कमी असल्यास एअरबॅग ऍक्टीव्ह होणार नाहीत. मात्र, हे कंपनी कारमध्ये एअरबॅग्ज उघडण्यासाठी किती वेग ठरवते, यावर अवलंबून आहे. हे वेगावर तसेच प्रभावावर अवलंबून असते. (Car Safety Features)

Car Airbags
Six Airbags : स्वस्तात मस्त कार Maruti Baleno

सेन्सर कमी असणे

जेव्हा कारमध्ये असलेले एअरबॅग सेन्सरवर कार्यरत असतात. तेव्हा एअरबॅग सामान्यतः तैनात होतात. जर प्रभाव कमी असेल आणि अपघाताची तिव्रता सेन्सर्सपर्यंत पोहोचली नाही, तर एअरबॅग काम करमार नाहीत. असे सहसा कारचा कमी वेग असेल तर होते.

एअरबॅग सिस्टममध्ये बिघाड

एअरबॅग सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे एअरबॅग्स कदाचित सुरू होणार नाहीत. एअरबॅग सिस्टीममध्ये बिघाड आढळल्यास, ती ताबडतोब दुरुस्त करावी. तसेच, वेळोवेळी त्याची तपासणीही करावी. कारण, हे एक महत्त्वाचं फिचर आहे. (Airbags in car)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.