Best Car Colors : लाल कि पांढरा, या रंगाच्या गाडीचे होतात जास्त अपघात, तूमची गाडी कोणत्या रंगाची?

Best Car Colors: या रंगाच्या गाडीचा होत नाही अपघात, तूमची गाडी कोणत्या रंगाची?
Best Car Colors
Best Car Colorsesakal
Updated on

Best Car Colors: टीव्हीवरील एखाद्या सिरीअलमधील हिरोची गाडी पाहुन तूम्हालाही तोच रंग आवडतो. त्याच रंगाची गाडी घ्यावी अशी इच्छा तूमची असते. त्यामूळे रंगाची जास्त माहिती न घेता आपण थेट गाडी बुक करतो. मग गाडीच्या वेगळ्या रंगामूळे एखाद्या अपघाताला सामोरे गेल्यावर मग आपण गाडीला रंगाला दोष द्यावा लागतो.

पण, या अपघातात चुक गाडीची नाही तर गाडीच्या रंगांची असते. होय, एका सर्व्हेनुसार काळ्या रंगाची कार क्रॅश होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. हे आम्ही म्हणत नाही आहोत तर हे एका अहवालातून स्पष्ट झालं आहे.

दिवाळीत बहुतांश लोक नवी  किंवा सेकंडहँड कार खरेदी करतात. कोणत्या कंपनीची कार घ्यायची?ती पेट्रोल, डिझेल की सीएनजी? तिचा मायलेज किती? आपल्या बजेटमध्ये बसणार का? असे प्रश्न कार खरेदी करताना बहुतेकांना पडत असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार खरेदी करताना प्रत्येकजण आधी कारचा रंग विचारात घेतात.

काही लोक पांढऱ्या रंगाला  जास्त प्राधान्य देतात तर काही लोकांना गडद रंगाच्या कार आवडतात. परंतु, तुम्हाला माहित आहे का? कोणत्या रंगाच्या कारला. अपघाताचा जास्त धोका असतो. याबाबत वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने आपला अहवाल दिला आहे.

या सगळ्यात प्राधान्य असते ते कारचा रंग कोणता आहे. तुमच्या मनाला दिलासा देतो. पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही खरेदी करत असलेल्या कारच्या रंगामुळे अपघात होण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला कारच्या रंगांबद्दल सविस्तर माहिती देऊ.

पांढऱ्या रंगाची गाडी अधिक सुरक्षित माणली जाते
पांढऱ्या रंगाची गाडी अधिक सुरक्षित माणली जाते

ब्लू बुकच्या मते, सिल्वर हा कारमधील सर्वात लोकप्रिय रंग पर्याय आहे. त्यानंतर पांढऱ्या रंगाचा नंबर लागतो. तथापि, मोनाश विद्यापीठाच्या अपघात संशोधन केंद्राने केलेल्या संशोधनानुसार, सुरक्षा मानांकनाच्या दृष्टीने पांढरा रंग चांदीपेक्षा अधिक सुरक्षित रंग मानला जातो.

सर्व्हेसानुसार, पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये अपघात किंवा अपघात होण्याची शक्यता काळ्या रंगाच्या कारच्या तुलनेत 12 टक्के कमी असते. पांढऱ्यानंतर क्रीम किंवा पिवळ्या रंगाच्या कार अधिक सुरक्षित मानल्या जातात.

काही अभ्यासांमध्ये सुरक्षेच्या निकषावर पांढऱ्या रंगाच्या कारच्या तुलनेत पिवळा रंग पुढे असल्याचे मानले जात असले तरी. सर्वात धोकादायक रंग कोणता आहे? या अभ्यासात काळ्या रंगाच्या कारचे वर्णन सर्वात धोकादायक मानले गेले आहे. याशिवाय इतर अनेक रंगही कारसाठी कमी सुरक्षित मानले गेले आहेत. यामध्ये राखाडी (11 टक्के), चांदी (10 टक्के), निळा (7 टक्के) असुरक्षीत मानले जातात. 

वाहनांमध्ये कोणते रंग आहेत?

कारमध्ये फिकट आणि गडद असे दोन प्रकारचे रंग आहेत. पण फिकट रंग अधिक सहज दिसतो. ऑटो अ‍ॅक्सेसरीज गॅरेजचे मॅनेजर म्हणतात, “पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगासारखे हलके रंग सहज दिसत असल्याने ते अपघातात बळी पडत नाहीत.

गडद रंगाच्या कारपेक्षा पांढऱ्या रंगाची कार सहज दिसते. गडद रंग रात्री क्वचितच दिसत असतात. दिवसा उजेडात तो रस्त्यात मिसळतो. जे काही वेळा ड्रायव्हरला ओळखणे कठीण होते. त्यामुळे त्याचा पाय ब्रेक पेडलपर्यंत पोहोचतो तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार, काळ्या रंगाच्या कारला अपघात होण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते. काळ्या रंगाच्या कारला अपघात होण्याची शक्यता 47 टक्के आहे.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या अहवालात म्हटलं आहे, की पांढऱ्या रंगाच्या कारला अपघाताच सर्वात कमी धोका आहे. यानंतर पिवळा, नारंगी आणि सोनेरी रंगाच्या कारला देखील अपघाताची भीती कमी असते.

रंग निवडताना होतो गोंधळ
रंग निवडताना होतो गोंधळesakal

लोकांच्या पसंतीला उतरले हे रंग

ऑटोमोटिव्ह OEM कोटिंग्जसाठी BASF च्या कलर रिपोर्ट २०२१ नुसार, भारतात ४० टक्के लोक पांढऱ्या रंगाच्या कारला प्राधान्य देतात. त्यानंतर १५ % लोक राखाडी रंगाच्या गाड्यांना पसंती देतात. आम्ही देखील या अहवालाची पुष्टी करत नाही.

एक सत्य हे देखील आहे की जगात पांढऱ्या रंगाच्या बहुतेक गाड्यांवर विश्वास व्यक्त केला जातो. त्याचवेळी, भारतातील पहिली कार खरेदी करणाऱ्या प्रत्येक १० लोकांपैकी ४ जण पांढऱ्या रंगाची कार खरेदी करतात.

भारतात पांढऱ्या रंगाचीच जास्त विक्री

  • जे.डी.पाँवरच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येत २ कारमागे एका कारचा रंग पांढरा आहे. भारतीय लोक भडक रंगाऐवजी फिक्या रंगाला पसंती देत असल्याचे या सर्व्हेत म्हटले आहे.

  • देशातील एक चतृतांश विक्री झालेल्या कार या सिल्वर किंवा ग्रे रंगाच्या होत्या. तर उत्तर भारतातील लोक दक्षिण भारतापेक्षा जास्त पांढऱ्या रंगाला पसंती देत आहेत.

  • दक्षिण भारतातील लोक ३४% पांढऱ्या कार वापरतात तर उत्तर भारतातील लोक ६६% लोक पांढऱ्या कार वापरतात.

  • २०१३च्या कारच्या विक्रीमध्ये ११% रंगाच्या कारची विक्री झाली आहे तर ४% काळ्या रंगाच्या कारची विक्री झाली आहे. मध्यंतरी तरूणाईमध्ये अशा भडक रंगाच्या कारची जास्त क्रेझ दिसून येत होती पण आता फिक्या रंगाला भारतीय लोकांची जास्त पसंती मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.