Car Maintain Tips : कडक उन्हाळ्यातही गाडी राहणार Cool ; असा हाताळा तूमच्या कारमधला AC!

तूम्ही तूमच्या कारची काळजी घेताय ना? नसेल तर हे वाचा
Car Maintain Tips : कडक उन्हाळ्यातही गाडी राहणार Cool ; असा हाताळा तूमच्या कारमधला AC!
Updated on

अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. दिवसभर ऑफिसमध्ये असताना उन्हाच्या झळा लागत नाहीत. पण, भर दुपारचं ऑफिसमधून बाहेर पडलो की मात्र जीव कासावीस होतो. अशात प्रत्येकाच्या कारमध्ये असलेला एअर कंडीशनर अर्थात एसी जीवाला जरा थंडगार करतो.

हल्ली बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश कार्समध्ये एसी हे फीचर मिळू लागलं आहे. याचा आपण उन्हाळ्यात खूप वापर करतो. परंतु या फीचरचा वापर हिवाळ्यात देखील करायला हवा. खरंतर हिवाळ्यात याची गरज भासत नाही. कारमधील इतर फीचर्स नीट काम करत राहावे यासाठी एसीची गरज नसते.

एसीची गरज केवळ आपल्यालाच नसते तर इतर मशीन्सना देखील एसीची म्हणजेच थंड वातावरणाची गरज असते. जसं की आपल्या ऑफिसमधील एसी हा आपल्याइतका आपल्या कॉम्प्यूटर आणि लॅपटॉपसाठी गरजेचा असतो. त्यामुळे कारमधील एसीची आपण काळजी घेतली पाहिजे.

Car Maintain Tips : कडक उन्हाळ्यातही गाडी राहणार Cool ; असा हाताळा तूमच्या कारमधला AC!
Solar Car : इनोव्हेशनला सलाम! टाटा नॅनोपासून बनवली 'सोलार कार'; फक्त ३५ रुपयांत चालते १०० किमी

भर दुपारचं शॉपिंग किंवा बाहेर कामासाठी गेलो की खरी एसीची किंमत कळते. अशा उन्हाळ्यात तूमचा एसी बंद पडू नये असे वाटत असेल तर काय काळजी घ्यावी. एसी कसा मेंटेन करावा याच्या काही खास टिप्स आज पाहूयात.

एसीचे सर्व्हिसिंग

संपूर्ण उन्हाळा एसी सुरू रहावा असे वाटत असेल तर तूम्ही एसीचे सर्व्हिसिंग केले पाहिजे. तूम्ही एसी नियमित वापरत असाल तर त्यात काही बिघाड होण्याची शक्यता कमी आहे. पण, कधीतरीच एसी वापरणाऱ्या लोकांनी उन्हाळा सुरू होण्याआधी एसी तपासून घ्यावा.

नेहमी एसीचे सर्व्हिसिंग करत रहा
नेहमी एसीचे सर्व्हिसिंग करत रहाesakal
Car Maintain Tips : कडक उन्हाळ्यातही गाडी राहणार Cool ; असा हाताळा तूमच्या कारमधला AC!
उंदरांना कारमध्ये शिरण्यापासून कसं रोखालं? : Car Tips

फिल्टर्स स्वच्छ ठेवा

कारच्या एअर कंडिशनिंग सिस्टममध्ये एअर फिल्टर असतात. हे फिल्टर वेळोवेळी साफ करणे आवश्यक आहे. त्यासाठी गाडी वर्कशॉपमध्ये नेण्याची गरज नाही. तर तुम्ही ते स्वतःच साफ करू शकता. उन्हाळ्याच्या आधीच हे फिल्टर साफ करून घ्या किंवा गरज असल्यास ते बदलून घ्या.

Car Maintain Tips : कडक उन्हाळ्यातही गाडी राहणार Cool ; असा हाताळा तूमच्या कारमधला AC!
Luxury Cars Collection : रोल्स रॉयस ते मर्सिडीज, अक्षय कुमारच्या गॅरेजमधलं शानदार कलेक्शन बघितलंत?

एअर फिल्टर्स का महत्त्वाचे

एअर फिल्टर्समध्ये घाण साचली तर इंजिनपर्यंत पुरेशी हवा पोहोचत नाही. यामुळे सातत्याने थ्रोटल इनपुट्सनंतरही कारच्या एक्सलरेशनमध्ये कमी पाहायला मिळते. यामुळे कारच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. तसेच एअर फिल्टर्समध्ये घाण साचल्याने इंजिनला पुरेशी हवा मिळत नाही. यामुळे इंजिनमध्ये कार्बन डिपॉझिट होण्याची भीती असते.

वेळोवेळी एअर फिल्टर्स बदलत रहा
वेळोवेळी एअर फिल्टर्स बदलत रहाesakal
Car Maintain Tips : कडक उन्हाळ्यातही गाडी राहणार Cool ; असा हाताळा तूमच्या कारमधला AC!
CNG Car Tips : कारमध्ये CNG असेल तर काळजी घ्या, या गंभीर चुका टाळा

गाडी सावलीत पार्क करा

कामासाठी जात असताना घाईत आपण गाडी उन्हात पार्क करतो आणि निघून जातो. पण परत आल्यावर गाडी तापलेली असते. गाडी पून्हा नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी एसीला जास्त एनर्जी खर्च करावी लागते. त्यामूळे गाडी पार्क करण्यासाठी सेफ जागा शोधा.

उन्हाळ्याच्या आधी, जेव्हा एसी सर्वात जास्त वापरले जाईल तेव्हा फिल्टर बदलून घ्या. जेणेकरुन तुम्हाला कडक उन्हाळ्यात एसीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

Car Maintain Tips : कडक उन्हाळ्यातही गाडी राहणार Cool ; असा हाताळा तूमच्या कारमधला AC!
Top 5 CNG Cars : 35.60 किमी पर्यंत मायलेज देणाऱ्या या कार्स, किंमत 9 लाखांपेक्षा कमी

सावलीत कार पार्क करा

उन्हाळ्याच्या दिवसात आपण सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे उन्हात कार पार्क करणे. उन्हाळ्यात सावलीच्या ठिकाणी कार पार्क केल्याची खात्री करा. याचा फायदा असा होईल की कारचे केबिन लवकर थंड होईल आणि कारच्या एसीला केबिन थंड करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागणार नाही. तुम्ही परत कारमध्ये आल्यावर केबिन थंड होण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.

झाडाखाली गाडी पार्क करा
झाडाखाली गाडी पार्क कराesakal
Car Maintain Tips : कडक उन्हाळ्यातही गाडी राहणार Cool ; असा हाताळा तूमच्या कारमधला AC!
​Made in India Top 5 EVs : भन्नाट फिचरच्या 'Made In India Car', तुम्हाला कुठली आवडली, लगेच करा पसंत

एसी कितव्या मोडला असावा

गाडीत बसल्यानंतर सर्वात आधी एसी सुरू करून तो टॉप मोडला घेतला जातो. पण, यामूळे काहीच फायदा होत नाही. एसी आधी लोअर मोडला आणि मग हळू हळू टॉप मोडवर घ्यावा. तसेच गाडीच्या काचाही खाली घ्याव्यात. ज्यामूळे गाडीतील गरम हवा बाहेर जाईल.

एसी वापरात ठेवा

थंडी, पावसाळ्यात एसी न वापरणारे लोक आहेत. असे न करता एसी नियमीत वापरावा. कारण, रोज वापरात असलेल्या वस्तू कायम सुस्थितीत असतात. कधीतरी वापरणाऱ्या वस्तूंवर गंज बसतो आणि त्या खराब होतात. त्यामूळे एसी रोज वापरा.

लेटेस्ट कारमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल फिचर असते. जे कारमधील तापमान नियंत्रणामध्ये ठेवते. दररोज एसीचा वापर केल्याने त्यातील सर्व भाग हे चांगल्या स्थितीमध्ये राहण्यास मदत होते.

रिसर्क्युलेशन मोड

कामधील एसी सुरू केल्यानंतर थोड्या वेळाने थंड हवा कारमध्ये पसरण्यास सुरूवात होते. तेव्हा रिसर्क्युलेशन मोड एनेबल करायला हवा. हा मोड एनेबल केल्याने एसी बाहेरची हवा आत घेत नाही. तसेच केबिनमध्ये असलेल्या हवेचाच वापर केला जातो. हा मोड वापरल्याने एसी कोणतंही प्रेशर न घेता कारमधील वातावरण थंड करतो.

Car Maintain Tips : कडक उन्हाळ्यातही गाडी राहणार Cool ; असा हाताळा तूमच्या कारमधला AC!
Car Care Tips : कार वायपर वापरण्याची योग्य पद्धत बऱ्याच जणांना माहिती नाही, जाणून घ्या योग्य पद्धत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()