Car Parking Tips : पार्किंग करायला अवघड जातंय? कारमध्ये बसवून घ्या 'हे' खास गॅजेट्स; सोपं होईल काम

Car Parking Gadgets : कार पार्किंग सोपं जावं यासाठी सध्याच्या नवीन गाड्यांमध्ये कित्येक फीचर्स देण्यात येतात.
Car Parking Tips
Car Parking TipseSakal
Updated on

गाडी चालवता येते, लायसन्सही आहे; मात्र कार पार्क करण्याची भीती वाटते अशी परिस्थिती बऱ्याच जणांची असते. कार रिव्हर्स घेणं आणि पार्क करणं हे बऱ्याच जणांना जमत नाही. तुम्हालाही अशीच अडचण असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

कार पार्किंग सोपं जावं यासाठी सध्याच्या नवीन गाड्यांमध्ये कित्येक फीचर्स देण्यात येतात. यामध्ये पार्किंग सेन्सर, रिअर कॅमेरा आणि 360 कॅमेरा अशा फीचर्सचा समावेश आहे. मात्र, कित्येक जुन्या गाड्यांमध्ये असे फीचर्स उपलब्ध नाहीत.

Car Parking Tips
Monsoon Car Tips : आला पावसाळा, गाड्या सांभाळा! अपघात टाळण्यासाठी तपासून घ्या टायर; पाहा कसं

अशा वेळी पार्किंग करण्यासाठी काही गॅजेट्स तुमची मदत करू शकतात. तुम्ही बाजारातून हे गॅजेट्स घेऊन आपल्या कारमध्ये इन्स्टॉल करू शकता. यामध्ये सर्वात लोकप्रिय गॅजेट म्हणजे, पार्किंग सेन्सर.

पार्किंग करताना मागे काही अडथळा आल्यास, कार त्याला धडकण्यापूर्वीच पार्किंग सेन्सर बीप-बीप वाजून चालकाला अलर्ट देते. कॅमेऱ्यापेक्षा पार्किंग सेन्सर हे जास्त स्वस्त असतात. (Car Tips)

Car Parking Tips
Monsoon Car Tips : पावसाळ्यात गाडी चालवताना येऊ शकतात कित्येक अडचणी; गाडीत बसण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की तपासा

पार्किंग कॅमेरा

तुमच्या गाडीमध्ये मागच्या बाजूला कॅमेरा नसेल, तर आफ्टरमार्केट अ‍ॅक्सेसरी म्हणून तुम्ही तो खरेदी करू शकता. तुमच्या कारच्या मागे दिसणारं दृश्य हा कॅमेरा तुम्हाला पुढे स्क्रीनवर दाखवतो. त्यामुळे तुम्ही आरामात गाडी पार्क करू शकता.

360 डिग्री कॅमेरा

हे एक अतिशय लोकप्रिय गॅजेट आहे. या कॅमेऱ्यामुळे तुमच्या कारच्या चारही बाजूला लक्ष ठेवलं जातं. यासाठी सेन्सर्सची आणि चार कॅमेऱ्यांची मदत घेतली जाते. यामुळे कोणत्याही बाजूचं दृश्य तुम्हाला आपली मानही न वळवता पहायला मिळतं.

Car Parking Tips
Car Tips : कारमधून येणाऱ्या काळ्या आणि पांढऱ्या धुरामध्ये काय आहे फरक? वेळीच घ्या खबरदारी, अन्यथा होईल मोठं नुकसान

कार पार्क करताना अपघात होण्याची शक्यता मोठी असते. कारच्या मागे लक्ष नसताना कोणी आल्यास गंभीर दुर्घटना होऊ शकते. तसंच, भिंतीला किंवा अन्य गोष्टींना गाडी धडकल्यास कारचंही मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे गाडी नीट पार्क करता येणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.