Car Price Tips: कार घ्यायचीय पण योग्य किंमत कशी ठरवाल!

गाडी खरेदी करताना हवी या गोष्टींची माहिती
Car Price Tips
Car Price Tipsesakal
Updated on

Car Price Tips : स्वत:च्या अंगनात गाडी उभी असणं हे खरंच प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण, काहींसाठी हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी रिटायरमेंटची वाट पहावी लागते. एकदा का ठरवलं की कार घ्यायची तर तेव्हा योग्य कार निवडण्यापासून ते सर्वोत्तम किंमत मिळवण्यापर्यंत सर्व माहिती असावी लागते.

कार खरेदी करताना प्रत्येकाचा प्रयत्न असतो की, आपल्याला कार स्वस्तात मिळावी. परंतु नवीन कारवर लावले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस हे शोरूम किंमतीपेक्षा ऑन रोड प्राईस खूप वाढवतात. अशा वेळी ग्राहकाकडे हे चार्जेस देण्यावाचून दुसरा पर्याय देखील नसतो.

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही एखादी महागडी कार कमी किंमतीत खरेदी करू शकता. परंतु यासाठी तुम्हाला डीलरशिप्सकडे काही गोष्टींची मागणी करावी लागेल.

Car Price Tips
Best Mileage Cars : बेस्ट Mileage देणाऱ्या देशातल्या टॉप कार्स कोणत्या? तूम्ही कोणती कार निवडाल!

जेव्हा तुम्ही कारच्या शोरूममध्ये प्रवेश करता. तेव्हा तुमच्या मनात पहिला प्रश्न येतो, कारची किंमत कशी ठरवायची? पण कोणताची संकोच न बाळगता तूम्ही या बद्दल डिलरशी बोलले पाहिजे. जेव्हा डीलर एखाद्या विशिष्ट वाहनाची किंमत ठरवतो. तेव्हा बार्गेनिंगसाठी नक्कीच जागा असते.

कारची किंमत ठरवताना तूम्हाला डीलर आणि कंपनी यांच्या सवलतीच्या ऑफर जाणून घेणे गरजेचे आहे. कारसाठी विविध प्रकारच्या सवलती उपलब्ध असतात.

डिलर सांगतो त्याच किंमतीला कार घेऊ नका
डिलर सांगतो त्याच किंमतीला कार घेऊ नकाesakal
Car Price Tips
Car Maintenance Tips : खर्च कमी अन् जास्त मायलेज;  या टिप्स फॉलो करा अन् कारचे आयुष्य वाढवा!

सवलतींचा विचार करा

एखाद्या मोठ्या सणाला शोरूममधील लोक कारच्या खरेदीवर ऑफर देत असतात. ऑफरमध्ये ५० हजार इतक्या रकमेपर्यंत तूम्हाला सूट मिळू शकते. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो

बार्गेनिंग

कार डिलरसोबत बार्गेनिंग करताना तुम्ही हजरजबाबी राहिलं पाहिजे. डिलर म्हणेल त्याच किमतीला कार घेऊ नका. त्याच्याशी बोलून किंमत कमी होते का हे पहा. डिलरसोबत बोलण्यासाठी तूम्ही ज्या किंमतीत कार मागत आहात. त्याची पूर्ण माहिती ठेवा. यासाठी बाजार व्हॅल्यू आणि अधिक गोष्टींची माहिती डिलरला भेटण्याआधीच करून घ्या.  

सर्वोत्तम किंमत मिळवण्यासाठी हे करा

तुम्ही डीलरला भेटण्याआधीच तुम्हाला नवीन कारची किंमत आणि डीलरशिप मार्जिन माहित असणे आवश्यक आहे. डीलर मार्जिन हे दुसरे काहीही नसून कार शोरूमने नवीन कार विकून मिळवलेला नफा आहे.

आरटीओ शुल्क

हे रोड टॅक्स आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) येथे भरलेल्या वाहन नोंदणी शुल्क  आहे. डीलर नोंदणीसाठी जास्त शुल्क घेऊ शकत नाही. कार खरेदी करताना त्यासाठीच्या पावत्या घेतल्याची खात्री करा.

ऑफरमधून कार घेणं फायद्याचं असतं
ऑफरमधून कार घेणं फायद्याचं असतंesakal
Car Price Tips
Car Buying Decision: बजेट अन् गरज ओळखून तुमच्यासाठी परफेक्ट कार कशी निवडाल? या टिप्स करतील मदत!

कारचा विमा

नवीन कार खरेदी करताना 3 वर्षांचा थर्ड-पार्टी विमा आणि 1 वर्षाचा स्वतःचा नुकसान कव्हर घेणे अनिवार्य आहे. विम्यासाठी डीलर मार्जिन 1% च्या आसपास आहे. तूम्हाला हे नको असेल तर तुम्ही स्वत:च कारचा विमा उतरवू शकता.

कारच्या अॅक्सेसरीज

कोणत्याही अॅक्सेसरीज गरज नसताना डिलर ते गळ्यात मारतो. आपण ते घेतो. पण, त्याचा फारसा उपयोग होत नाही. पण, कार खरेदीच्या बिलात त्याची रक्कम असते. परिणामी कारची किंमतही अवाढव्य होते. कारण, अॅक्सेसरीज किंवा सेवांसाठी डीलरचे मार्जिन 25-30 % इतके असते.

फायनान्स चार्जेस

तुम्ही कार लोनची निवड करत असाल तरच हे लागू होते. डीलरला कार कर्ज विकण्यासाठी बँकेकडून पेआउट मिळतो आणि कर्जाच्या रकमेच्या सुमारे 1% मार्जिन असते. एक व्यापारी नफा वाढवण्यासाठी जास्त व्याज दर देऊ शकतो. परंतु तुम्ही नेहमी सर्वोत्तम व्याजदरासाठी बार्गेनिंग करू शकता.

Car Price Tips
Car साठी नक्की काय योग्य? CNG की LPG

ऑन-रोड किंमत

ही वर नमूद केलेल्या सर्व घटकांची बेरीज आहे. शोरूममधून तुमची नवीन कार काढून टाकण्यापूर्वी तुम्ही डीलरला दिलेली अंतिम रक्कम ही ऑन-रोड किंमत आहे.

या गोष्टी करतील मदत

डिलरसोबत आत्मविश्वासाने बोला

बोलण्यात संकोच करू नका

घाई करू नका

हुशारीने बोला आणि अधिक ऐका

सर्वोत्तम किंमत मिळवा

बाजार मूल्य निश्चित करा

तुमच्या किंमतीवर ठाम रहा

 

 

Car Price Tips
Upcoming SUV Cars : ह्युंदाई क्रेटाला टक्कर द्यायला येणार या तीन नव्या SUV

डिस्काउंट मागा

कार खरेदी करताना डीलरशिप्सकडून डिस्काउंट देखील मागा. शोरूम मॅनेजरने ठरवलं तर तो तुम्हाला कारवर डिस्काउंट मिळवून देऊ शकतो. अनेकदा वाहन उत्पादक कंपन्या देखील त्यांच्या वाहनांवर डिस्काउंट देतात. याबद्दल ग्राहकांना माहिती नसते. बहुतांश वाहन उत्पादक कंपन्या प्रत्येक महिन्यात त्यांच्या वेगवेगळ्या वाहनांवर मंथली डिस्काउंट ऑफर्स जाहीर करत असतात. ग्राहक या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.

Car Price Tips
SUV Car Price : अबब ! या आलिशान SUV ची किंमत आहे 7 लाखांपेक्षा सुद्धा कमी..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.