Car Tips : कारमधून येणाऱ्या काळ्या आणि पांढऱ्या धुरामध्ये काय आहे फरक? वेळीच घ्या खबरदारी, अन्यथा होईल मोठं नुकसान

दोन्ही प्रकारच्या धुरांचे अर्थ वेगवेगळे असले, तरी असा धूर येणं हे धोकादायकच असतं.
Car Tips
Car TipseSakal
Updated on

कार चालवताना सायलेन्सरमधून धूर येणं साधारण बाब आहे. हा धूर सहसा आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही. मात्र, जर हा धूर तुम्हाला दिसत असेल, तर याचा अर्थ तुमच्या कारच्या इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे. कारमधून निघणाऱ्या पांढऱ्या आणि काळ्या धुराचे अर्थ वेगवेगळे असतात. याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.

दोन्ही प्रकारच्या धुरांचे अर्थ वेगवेगळे असले, तरी असा धूर येणं हे धोकादायकच असतं. बऱ्याच वेळा कारमधून धूर येण्यापूर्वी डॅशबोर्डवर असणाऱ्या इंजिन साईनची लाईट लागते. या लाईटचा अर्थ तुमच्या इंजिनमध्ये खराबी आहे, आणि ते तपासून घेण्याची गरज आहे. त्यामुळे या लाईटकडे दुर्लक्ष करू नका.

Car Tips
Automatic Cars : गिअरची कटकट नको म्हणून ऑटोमॅटिक कार घेताय? आधी हे तोटे वाचाच

पांढरा धूर

जेव्हा तुमच्या गाडीतून मोठ्या प्रमाणात पांढरा धूर येत असेल, तेव्हा हे इंजिनचे गॅस किट खराब झाल्याचे लक्षण असते. इंधन आणि कूलिंग वॉटरला वेगवेगळं ठेवण्यासाठी जे सील लावलेलं असतं, त्यामध्ये लीकेज असल्यामुळे इंधन आणि पाणी एकत्र होतं. यामुळे कारमधून पांढरा धूर येतो. यामुळे कारचा पिकअप कमी होतो, मिसिंगची समस्या निर्माण होते आणि मायलेजही कमी होतं.

अशा प्रकारची समस्या निर्माण झाल्यास तातडीने गॅस किट बदलून घ्यावे. अन्यथा संपूर्ण इंजिन यामुळे खराब होऊ शकतं. यानंतर इंजिन दुरुस्तीचा खर्च लाखोंमध्ये येतो. त्यामुळे वेळीच खबरदारी घेणं गरजेचं आहे.

काळा धूर

कारमधून काळा धूर येण्याचं कारण म्हणजे इंधनासोबत इंजिन ऑईलही जळत आहे. इंजिनचे रिंग, पिस्टन आणि हेड गॅसकिट खराब असल्यामुळे हे होतं. पिस्टन रिंग्स खराब असल्यामुळे पिस्टन बोअरमध्ये ऑईल जातं, आणि पेट्रोल किंवा डिझेलसोबत तेही जळतं.

Car Tips
Car Tips : अचानक ब्रेक फेल झाल्यावर काय कराल? या टिप्स वाचवतील तुमचा जीव

अगदी सुरूवातीच्या टप्प्यात जर तुम्ही गाडी दुरूस्तीला नेली, तर केवळ रिंग्स बदलण्याची गरज भासते. मात्र, जर अनेक दिवस तुम्ही टाळाटाळ केली, तर तुम्हाला सर्व इंजिन दुरूस्त करावं लागतं. दरम्यानच्या काळात, जेवढी समस्या वाढेल तेवढं कारचं मायलेज कमी होत जातं, तसंच कारची पॉवरही कमी होते.

हे संकेत पाहा

कारच्या इंजिनमध्ये काही खराबी असल्यास, डॅशबोर्डवर इंजिनची लाईट लागते. जर तुम्ही कार सुरू केल्यावर लगेच हे साईन सुरू होतंय, आणि काही वेळानंतर बंद होतंय; तर कारच्या हेड गॅसकिटमध्ये खराबी असल्याचा हा संकेत आहे. तसंच, जर इंजिन लाईटसोबत ऑईल गेजचं साईनही दिसत असेल तर हा रिंग्स आणि गॅसकिट खराब असल्याचा संकेत आहे. अशा वेळी तातडीने गाडी मेकॅनिककडे नेणं गरजेचं आहे.

Car Tips
Car Colour : कोणत्या रंगाची कार आहे तुमच्यासाठी परफेक्ट? ज्योतिषाला विचारण्याऐवजी हे वाचा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.