Car Sunroof : टाटा मोटर्सने गेल्या ऑटो एक्स्पोमध्ये CNG सेगमेंटमध्ये आपल्या दोन नवीन कार सादर केल्या. ज्यामध्ये अल्ट्रोज सीएनजी आणि पंच सीएनजीचा समावेश होता.
अलीकडेच, कंपनीने Altroz CNG चे बुकिंग सुरू केले होते, जे ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा अधिकृत डीलरशिपद्वारे बुकींगची रक्कम 21,000 रुपये भरून बुक करू शकतात. आता ही कार लॉन्च होण्यापूर्वीच तिचे काही तपशील लीक झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, Altroz CNG एकूण 6 व्हेरियंटमध्ये येऊ शकते, त्यापैकी तीन व्हेरियंटमध्ये सनरूफ दिले जाऊ शकतात. या कारचे सध्याचे ICE (नियमित) मॉडेल एकूण 15 प्रकारांमध्ये येते.
याशिवाय या कारमध्ये काही खास फीचर्स देखील समाविष्ट करण्यात आले आहेत, जे या कारला एक उत्तम प्रीमियम सीएनजी कार म्हणून सादर करेल. या कारची मारुती बलेनो सीएनजीशी स्पर्धा होईल.
कंपनीने ऑटो एक्सपोमध्ये दाखवलेले मॉडेल हॅचबॅकसारखेच आहे. iCNG बॅज व्यतिरिक्त, त्याच्या बाह्य भागामध्ये कोणतेही मोठे बदल दिसणार नाहीत.
पण , त्याच्या बूटमध्ये थोडासा फरक नक्कीच दिसून येईल, कारण त्याच्या बूटमध्ये ड्युअल-सिलेंडर देण्यात आला आहे. 60 लिटरच्या मोठ्या सिलिंडरऐवजी 30 लिटर क्षमतेचे दोन सिलिंडर देण्यात आले आहेत.
Tata Altroz CNG ची खास गोष्ट म्हणजे CNG कार असूनही, तुम्हाला बूट-स्पेस (डिग्गी) मध्ये तडजोड करावी लागणार नाही.
यामध्ये सीएनजी सिलेंडर बूटच्या तळाशी बसवण्यात आला असून वरून एक मजबूत ट्रे देण्यात आला आहे, जो त्याचे बूट वर आणि खाली असे दोन भाग करतो. टाटा मोटर्सचा दावा आहे की ही देशातील पहिली सीएनजी कार आहे जी ड्युअल सिलेंडर तंत्रज्ञानासह येत आहे.
या कारला 1.2L Revotron इंजिन दिले जाईल जे पेट्रोल मोडमध्ये 88Ps पॉवर आणि 115Nm पीक पॉवर आणि टॉर्क जनरेट करते.
तर CNG मोडमध्ये, हे इंजिन 73.5 Ps पॉवर आणि 103Nm टॉर्क जनरेट करते. या प्रीमियम सीएनजी हॅचबॅकमध्ये सिंगल अॅडव्हान्स EUC आणि डायरेक्ट स्टेट CNG सारखी वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत.
या सीएनजी कारमध्ये कंपनी व्हॉईस असिस्टेड इलेक्ट्रिक सनरूफ देत आहे, जी व्हॉईस कमांडद्वारे ऑपरेट केली जाईल. म्हणजेच, आपण आवाज दिला कि त्याचे इलेक्ट्रिक सनरूफ उघडेल आणि बंद होईल.
प्रीमियम हॅचबॅक सीएनजी कार म्हणून, हे फिचर खूप चांगले आहे. याशिवाय कंपनी या कारमध्ये अनेक उत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्ये देखील समाविष्ट करत आहे, जी सीएनजी कारकडून अपेक्षित आहे.
टाटा मोटर्सने या सीएनजी कारमध्ये अनेक उत्तम सुरक्षा फीचर्स समाविष्ट केले आहेत. याच्या फ्युएल लीडमध्ये मायक्रो स्वीच आहे, जेव्हा तुम्ही पेट्रोल किंवा सीएनजी भरण्यासाठी जाता तेव्हा हा मायक्रो स्विच कारचे इग्निशन बंद करतो आणि कारमध्ये इंधन रिफिल होताच आणि लिड कॅप व्यवस्थित बंद होते.
इग्निशन चालू होते. म्हणजेच गाडी सुरू होते. सुरक्षेच्या दृष्टीने हे फीचर खूप चांगले आहे. सहसा तुम्ही इंधन भरायला जाता तेव्हा तुम्हाला कार बंद करण्यास सांगितले जाते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.