Car Tips for Winter : गाडीच्या काचेवर वारंवार येतोय फॉग? 'या' टिप्सचा होईल फायदा

गाडीच्या विंडशील्डवर असणारा फॉग काढून, ती अगदी क्लिअर करायची असेल, तर त्यासाठी काही सोप्या टिप्स अगदी फायद्याच्या ठरू शकतात.
Windshield Fog
Windshield FogeSakal
Updated on

Windshield Fog in Winter : हिवाळ्यात कारच्या काचेवर धुकं किंवा फॉग जमा होणं ही सामान्य बाब आहे. कारच्या आतील आणि बाहेरील तापमानातील फरकामुळे हे होतं. कित्येक वेळा बराच प्रयत्न करूनही हा फॉग पूर्णपणे हटत नाही. अशामुळे अपघात होण्याचा धोका असतो.

गाडीच्या विंडशील्डवर असणारा फॉग (Fog) काढून, ती अगदी क्लिअर करायची असेल, तर त्यासाठी काही सोप्या टिप्स अगदी फायद्याच्या ठरू शकतात. याचीच माहिती आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. (Car Tips)

खिडक्या उघडणे

विंडशील्डवरील फॉग हटवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे, खिडक्यांच्या काचा उघडणे. गाडीच्या खिडक्या अगदी थोड्या जरी उघडल्या, तरी काही क्षणांमध्ये आतील आणि बाहेरील तापमान सारखं होऊन फॉग नाहीसा होतो. (Car Tips for Winter)

Windshield Fog
Winter Car Tips : हिवाळ्यात कार गरम ठेवण्यासाठी ब्लोअर वापरताय? एक छोटीशी चूकही ठरू शकते जीवघेणी! अशी घ्या खबरदारी

डीफ्रॉस्ट बटण

हिवाळ्यामध्ये गाडीच्या काचा उघडून थंड हवा आत येऊ देणे हा पर्याय काही जणांना नकोसा वाटू शकतो. अशा लोकांसाठी इतर पर्यायही उपलब्ध आहेत. कित्येक गाड्यांमध्ये आजकाल डीफ्रॉस्ट हा पर्याय उपलब्ध आहे. हे बटण दाबताच काही क्षणांमध्ये काचेवरील फॉग नाहीसा होईल. (Car Hacks)

फॅन

तुमच्या कारमध्ये डीफ्रॉस्ट बटण नसलं, तरीही एका ट्रिकने तुम्ही खिडक्या न उघडता फॉग हटवू शकता. यासाठी तुम्हाला केवळ एसीचा फॅन सुरू करून, टेम्परेचर वाढवावं लागेल. एसीचा व्हेंट विंडशील्डकडे केल्यास काही वेळातच काचेवरील फॉग नाहीसा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.