Dead Pedal: कारमध्ये डेड पॅडल का असतो? जाणून घ्या फायदे

तुम्हाला कारमधील डेड पॅडलचा वापर का केला जातो हे जाणून घेऊया.
Dead pedal benefits for car driver  ppb94
Dead pedal benefits for car driver ppb94Sakal
Updated on

जगभरात अनेक लोक कारचा वापर करतात. परंतु कारमधील डेड पॅडल म्हणजे काय हे अनेक लोकांना माहिती नसेल. त्याचा वापर वाहनचालकांसाठी कसा फायदेशीर ठरू शकतो हे जाणून घेऊया.

डेड पॅडल म्हणजे काय?

कार कंपन्या सर्व कारमध्ये एक्सलेटर, ब्रेक आणि क्लच पॅडलची सोय देतात. पण अनेक गाड्यांमध्ये दुसरे पॅडलही दिलेले असते. या पॅडलला डेड पेडल म्हणतात. सामान्य भाषेत लोक त्याला फूट रेस्ट या नावानेही ओळखतात.

कारमध्ये डेड पॅडल का आवश्यक आहे?

अनेकदा लोक कारने लांबचा प्रवास करतात. हायवे आणि एक्सप्रेस मार्गांवर फारच कमी वाहतूक आहे. त्यामुळे ड्रायव्हरचा डावा पाय खूपच कमी सक्रिय राहतो. प्रवासादरम्यान वाहन चालकाचा पाय सतत क्लचवर असतो आणि त्यामुळे काही वेळा क्लच दाबल्याने क्लच प्लेट खराब होण्याचा धोकाही वाढतो. कारमध्ये हे पॅडल क्लच पॅडलच्या डाव्या बाजूला असते.

Dead pedal benefits for car driver  ppb94
Car Care : कारमधील एसी फॅनचा वेग वाढवल्यास मायलेज कमी होऊ शकते का? जाणून घ्या सविस्तर

डेड पॅडलचे फायदे कोणते आहेत?

ज्या कारमध्ये डेड पॅडल दिले जाते,त्या वाहन चालकांना अनेक फायदे मिळतात. डेड पॅडलमुळे कारचा वेग जास्त असेल तर वळणावर नियंत्रण ठेवता येते. यामुळे कारचा अपघात होत नाही आणि वाहन चालक सुरक्षित राहतो.

आराम मिळतो

डेड पॅडलमुळे ड्रायव्हरला लांबच्या प्रवासात पायाला आराम देता येतो. ज्या गाड्यांमध्ये हे पॅडल दिलेले नसते, तेथे ड्रायव्हर प्रवासादरम्यान क्लच पॅडलवर पाय ठेवतो किंवा पाय बराच वेळ हवेत राहतो. त्यामुळे वाहनचालक लवकर थकतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.