Auto : सर्वसामान्यांना महागाईचा फटका; आजपासून 'या' कंपन्यांची वाहनं महागली

अनेक वाहन उत्पादकांची वाहनं आजपासून महाग होणार आहेत.
Mercedes Benz
Mercedes Benzesakal
Updated on
Summary

होंडा कार 1 एप्रिलपासून 12,000 रुपयांनी महाग होणार आहे. आत्तापर्यंत ही कार 6 लाख 89 हजारांमध्ये विकली जात होती.

1 एप्रिल 2023 पासून म्हणजेच आजपासून सरकारनं वाहनांसाठी नवीन उत्सर्जन नियम लागू केले आहेत, ज्यामुळं अनेक वाहन उत्पादकांची वाहनं आजपासून महाग होणार आहेत. जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, या लिस्टमध्ये तुम्ही निवडलेला ऑप्शन दिसतोय का बघून घ्या.

काही रिपोर्टनुसार, होंडा कार 1 एप्रिलपासून 12,000 रुपयांनी महाग होणार आहे. आत्तापर्यंत ही कार 6 लाख 89 हजारांमध्ये विकली जात होती आणि तिच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 9 लाख 48 हजार (एक्स-शोरूम) होती.

Mercedes Benz
VIDEO : भररस्त्यात आयोगाच्या पथकाकडून मुख्यमंत्र्यांच्या गाडीची झाडा-झडती; बोम्मईंच्या कारमध्ये काय सापडलं?

मारुती सुझुकी

आजपासून मारुती सुझुकीची वाहनंही महाग होणार आहेत. मात्र, कंपनीच्या कोणत्या मॉडेलची किंमत किती रुपयांनी किंवा किती टक्क्यांनी वाढणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

टाटा मोटर्स

टाटा मोटर्सनं काही काळापूर्वी घोषणा केली होती की, कंपनी 1 एप्रिल 2023 पासून आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 5 टक्क्यांनी वाढवणार आहे.

Mercedes Benz
Ram Navami Violence : रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक-गोळीबार; कलम 144 लागू, इंटरनेट सेवा बंद

हिरो मोटरकॉर्प

दुचाकी निर्माता Hero MotoCorp देखील 1 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून आपल्या स्कूटर आणि बाइकच्या किमती वाढवणार आहे. कंपनीने किंमती 2 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे संकेत दिले होते.

मर्सिडीज बेंझ

लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीजनेही कंपनी आपल्या मॉडेल्सच्या किमती 5 टक्क्यांनी वाढवणार असल्याची घोषणा केली होती. कंपनीनं यापूर्वी डिसेंबर 2022 मध्येही आपल्या मॉडेल्सच्या किमती 5 टक्क्यांनी वाढवल्या होत्या.

Mercedes Benz
Amit Shah : सासाराममधला अमित शहांचा कार्यक्रम रद्द; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले, आम्ही सम्राट अशोकाचा..

फोक्सवॅगन कार

जर तुम्हालाही फोक्सवॅगनची कार आवडत असेल तर आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2023 पासून वाहनांच्या किमती 2 टक्क्यांनी वाढतील. तैगुन, टिगुआन आणि व्हरटस सारखी मॉडेल्सच्या किमतीतही वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.