Digital Transaction : डिजिटल पेमेंटकडे वाढतोय भारतीयांचा कल

Online Payment : ९० टक्के लोकांकडून ‘कॅशलेस’ व्यवहारांना प्राधान्य
Digital Transaction Rates High in India
Digital Transaction Rates High in Indiaesakal
Updated on

Fianance : इंटरनेटची सहज उपलब्धतता, स्मार्टफोनचा वाढता वापर आणि अर्थसाक्षरता यामुळे भारतात मागील काही वर्षांत डिजिटल पेमेंट पद्धतीकडे कल वाढत आहे. भारतातील शहरी भागात ऑनलाइन खरेदी केल्यास ९० टक्के, ऑफलाइन खरेदी केल्यास जवळपास ५० टक्के लोक पैसे देण्यासाठी डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करतात. तसेच, भारतीय व्यापाऱ्यांचे ६९ टक्के व्यवहार डिजिटल माध्यमातून होत असल्याचे ॲमेझॉन पे आणि कीर्नी इंडियाने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

रस्त्यावर फळे-फुले विकणारे आणि दैनंदिन वस्तूंची विक्री करणारे ६० टक्क्यांपेक्षा जास्त विक्रेते कोणते ना कोणते डिजिटल पेमेंट माध्यम वापरतात, असे ॲमेझॉन पे इंडियाचे सीईओ विकास बन्सल म्हणाले. अर्थात २५ ते ४३ वर्षांचे मिलेनियल आणि ४४ ते ५९ वर्षांचे जेन एक्स या वयातील ग्राहक यात आघाडीवर आहेत. अर्थात बुमर्स म्हणजे साठ वर्षे आणि त्यावरील वयाचे ग्राहकदेखील डिजिटल पेमेंट स्वीकारतात. २० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले श्रीमंत ग्राहक ८० टक्के, तर पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेले ग्राहक ही ६७ टक्के व्यवहारांसाठी डिजिटल पेमेंट वापरत असल्याचे कीर्नी इंडियाचे शाश्वत शर्मा म्हणाले.

Digital Transaction Rates High in India
Flipkart Online Payments : आता कोणतही ऑनलाईन बिल भरा फ्लिपकार्टवरुन; कंपनीने आणली नवी सुविधा, गुगल अन् फोनपेला देणार टक्कर?

यूपीआय व्यवहारांचा वाढता आलेख

वर्ष रक्कम (कोटी डॉलरमध्ये)

२०१९ ५० हजार

२०२० ८० हजार

२०२१ १ लाख

२०२२ १.८० लाख

२०२३ २.७० लाख

२०२४ ३.६० लाख

डिजिटल पेमेंट कसे होते?

यूपीआय ५३%

डिजिटल वॉलेट १४%

क्रेडिट कार्ड ११%

डेबिट कार्ड ५%

प्री-पेड कार्ड १%

नेट बँकिंग ५%

Digital Transaction Rates High in India
Aadhar Linking Fraud : सिमकार्डला आधारकार्ड लिंक करताय? जरा जपून,अन्यथा 'या' महिलेसारखे गमवाल लाखो रुपये

कोणत्या शहरांत किती वापर?

५ लाखांहून कमी लोकसंख्या ६५%

५ ते १५ लाख ६९%

१५-५० लाख ७४%

५० लाखांपेक्षा अधिक ७५%

वयोगटनिहाय पेमेंट पद्धतीचा वापर

वयोगट कॅश यूपीआय वॉलेट कार्ड नेट बँकिंग इतर

१८-२४ ३३% ३८% ९% ९% ५% ६%

२५-४३ २७% ३६ १२% १५% ५% ५%

४४-५९ २६% ३२% १३% १६% ७% ६%

६०+ २९% २८% १३% १९% ८% ३%

यूपीआयचा सर्वाधिक वापर कोणाकडून?

लिंग कॅश यूपीआय वॉलेट कार्ड नेट बँकिंग इतर

महिला १२% ५२% १५% १३% ५% ३%

पुरुष ८% ५३% १३% १८% ४% ४%

धोक्याचीही भीती

ऑनलाइन खरेदी करण्यामागे व्यवहारांचा वेग आणि पुरस्कार हेदेखील महत्त्वपूर्ण प्रोत्साहन आहे. अर्थात चुकीमुळे दोनदा पैसे कापले जाणे आणि फसवणूक याबद्दल अनुक्रमे ५० टक्के आणि ५१ टक्के ग्राहकांना चिंता वाटते, असेही अहवालात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.