Chakshu Portal : ऑनलाईन गुन्ह्यांवर राहणार सरकारची 'नजर'; तक्रार करण्यासाठी लाँच केले दोन नवीन प्लॅटफॉर्म.. जाणून घ्या

Chakshu and DIP Platforms : तुमच्यासोबत सायबर फसवणूक झाली असेल, तर DIP वर त्याची माहिती द्या, आणि एखाद्या संशयास्पद नंबरवरून कॉल किंवा मेसेज येत असतील, तर त्याबाबत चक्षु पोर्टलवर तुम्ही माहिती देऊ शकता.
Chakshu Portal
Chakshu PortaleSakal
Updated on

Center Launches Chakshu and DIP to Combat Online Fraud : मोदी सरकारने आता ऑनलाईन गुन्ह्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. सेक्टॉर्शन, नोकरीचं आमिष, ब्लॅकमेल अशा प्रकारच्या ऑनलाईन गुन्ह्यांची तक्रार नोंदवण्यासाठी टेलिकॉम मंत्रालयाने दोन नवीन प्लॅटफॉर्म लाँच केले आहेत. चक्षु पोर्टल (Chakshu) आणि डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म (DIP) अशी यांची नावं आहेत.

टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. केंद्र सरकारच्या संचार साथी पोर्टलवर हे दोन्ही प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आले आहेत. तुमच्यासोबत सायबर फसवणूक झाली असेल, तर DIP वर त्याची माहिती द्या, आणि एखाद्या संशयास्पद नंबरवरून कॉल किंवा मेसेज येत असतील, तर त्याबाबत चक्षु पोर्टलवर तुम्ही माहिती देऊ शकता.

तक्रार करण्यासाठी कॅटेगरी

  • सेक्स्टॉर्शन, सरकारी अधिकारी किंवा त्यांचे नातेवाईक असल्याचं खोटं सांगणे, फेक कस्टमर केअर हेल्पलाईन

  • बँक, वीज, गॅस, पॉलिसी इत्यादी गोष्टींबद्दलचे फेक कॉल्स

  • रोबोटिक किंवा वारंवार येणारे स्पॅम कॉल्स

  • ऑनलाईन नोकरी, लॉटरी, गिफ्ट, लोन ऑफर यांसाठीचे फेक कॉल्स

  • संशयास्पद वेबसाईट किंवा लिंक असणारे मेसेज

  • इतर संशयास्पद कॉल किंवा मेसेज

कशी होणार कारवाई?

कॉल, व्हॉट्सअ‍ॅप आणि टेक्स्ट मेसेज अशा माध्यमातून कित्येक जणांना दररोज नोकरीचं आमिष किंवा पैसे कमावण्याचं आमिष दिलं जातं. कित्येकांना गुगल रिव्ह्यू किंवा क्रिप्टोच्या माध्यमातून पैसे कमावण्याची संधी असल्याचे मेसेज येतात. तुम्हालाही एखाद्या नंबरवरुन असे मेसेज वा कॉल येत असतील, तर त्याची माहिती चक्षु पोर्टलवर द्यायची आहे. यानंतर त्या नंबरची आणि मेसेजेसची पूर्ण पडताळणी केली जाईल. त्या नंबरपासून धोका असल्यास, तो नंबर बंद केला जाईल.

Chakshu Portal
Cyber Crime : आता कंपनीचे कॉल्स येणार सहा अंकी क्रमांकावरुन; फोनवरुन होणाऱ्या फसवणुकीला बसणार आळा!

ओळख राहणार गुप्त

या दोन्ही प्लॅटफॉर्मवर तक्रार करणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात येईल. संचार साथी पोर्टलवर देखील ही सुविधा उपलब्ध आहे. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हे पोर्टल लाँच करण्यात आलं होतं. आतापर्यंत या माध्यमातून धोकादायक असे 59 लाख मोबाईल कनेक्शन बंद करण्यात आले आहेत.

लाखो बँक अकाउंट फ्रीज

सरकारने आतापर्यंत सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणात तब्बल 10 लाखांहून अधिक बँक खाती फ्रीज केली आहेत. यामुळे देशातील नागरिकांचे 1,000 कोटींहून अधिक रुपये वाचले असल्याची माहिती सरकारने दिली. दररोज फसवणुकीची शक्यता असणारे 2,500 कनेक्शन्स कट करण्यात येत आहेत. तसंच, फ्रीज केलेली रक्कम फसवणूक झालेल्या व्यक्तींना परत देण्याची व्यवस्था देखील आरबीआय आणि इतर बँकेंसोबत मिळून केली जात आहे, असं वैष्णव यांनी स्पष्ट केलं.

Chakshu Portal
TRAI Caller ID : आता फोन आल्यावर स्क्रीनवर दिसणार कॉल करणाऱ्याचं खरं नाव; लवकरच मिळू शकतं खास फीचर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()