AirCharge Technology : आता चार्जिंग प्लगजवळ बेड ठेवण्याची गरज नाही; हवेतूनच चार्ज होणार मोबाईल! नवी टेक्नॉलॉजी सादर

CES 2024 : आपल्या एअरचार्ज तंत्रज्ञानाच्या मदतीने स्मार्टफोन खऱ्या अर्थाने वायरलेस पद्धतीने चार्ज होईल असा दावा कंपनीने केला आहे.
Infinix AirCharge Technology
Infinix AirCharge Technology eSakal
Updated on

Infinix AirCharge Technology : आजकाल स्मार्टफोन हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग झाला आहे. त्यामुळेच स्मार्टफोन नेहमी चार्ज असावा याकडे आपलं लक्ष असतं. कित्येक जण तर मोबाईल चार्जिंग करणं सोपं पडावं यासाठी चार्जिंग प्लगजवळ बेड लावून घेतात. किंवा मग, बेडजवळ एक्स्टेंशन कॉर्डने चार्जिंग प्लग घेतात. मात्र, आता हवेतच फोन चार्ज करणारी टेक्नॉलॉजी विकसित झाली आहे. अमेरिकेतील कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स इव्हेंटमध्ये हे तंत्रज्ञान सादर करण्यात आलं आहे.

इनफिनिक्स या कंपनीने हे नवीन तंत्रज्ञान सादर केलं आहे. आपल्या एअरचार्ज तंत्रज्ञानाच्या मदतीने स्मार्टफोन खऱ्या अर्थाने वायरलेस पद्धतीने चार्ज होईल असा दावा कंपनीने केला आहे. वायरलेस चार्जरपासून तब्बल 20 सेंटीमीटर दूर असलेला मोबाईलही चार्ज होणार आहे. हा मोबाईल 60 डिग्री कोनामध्ये असतानाही चार्ज होऊ शकतो हे विशेष!

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या एअरचार्ज टेक्नॉलॉजीच्या मदतीने 7.5W एवढ्या क्षमतेने मोबाईल चार्ज करता येऊ शकतो. या टेक्नॉलॉजीमुळे यूजर्स मोबाईलचा वापर करतानाही तो चार्ज करू शकणार आहेत. गेमिंग किंवा मूव्ही पाहताना याचा फायदा होईल, असंही कंपनीने म्हटलं आहे.

Infinix AirCharge Technology
UFO Video : अमेरिकेच्या मिलिट्री बेसवर दिसला यूएफओ? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

एक्स्ट्रीम टेम्परेचर टेक्नॉलॉजी

या इव्हेंटमध्ये (CES 2024) इनफिनिक्सने एक्स्ट्रीम टेम्परेचर टेक्नॉलॉजी बॅटरी लाँच केली. यामुळे अगदी थंड वातावरणामध्ये देखील फोनची बॅटरी खराब होत नाही असा कंपनीचा दावा आहे. तब्बल -40 डिग्री सेल्सिअस तापमानात देखील यामुळे स्मार्टफोन चालू शकतो. तसंच जास्तीत जास्त 60 डिग्री सेल्सिअस तापमानात देखील स्मार्टफोन वापरला जाऊ शकतो.

ई-कलर शिफ्ट

इनफिनिक्स कंपनीने या इव्हेंटमध्ये आणखी एक खास तंत्रज्ञान सादर केलं. यामुळे यूजर्स आपल्या स्मार्टफोनच्या मागच्या बाजूचा रंग बदलू शकणार आहेत. आपल्या मूडनुसार यूजर्स आपल्या फोनचा रंग बदलू शकतील. विशेष म्हणजे, यासाठी फोनचं चार्जिंग वापरलं जात नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं.

Infinix AirCharge Technology
Miami Alien : अमेरिकेतील शहरात फिरतोय दहा फुटांचा एलियन? व्हिडिओही समोर... काय आहे सत्य?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()