Cargo E-Bikes : खेडोपाडी पोहचणार इलेक्ट्रिक कार्गो सायकल, ही नवी योजना तुम्हाला माहिती आहे का?

ही योजना सुरुवातीच्या काळात फक्त ग्रामीण भागासाठी असेल.
Cargo E-Bikes
Cargo E-Bikessakal
Updated on

Cargo E-Bikes : सरकार नियंत्रित कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिस म्हणजेच CESL आता लोकांसाठी परवडणारी आणि बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक कार्गो सायकल लाँच करण्याच्या विचारात आहे. कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिस अर्थात CESL ची ही योजना सुरुवातीच्या काळात फक्त ग्रामीण भागासाठी असेल.

अशा सेगमेंट मधील सायकल आपल्याला शहरांमध्ये दिसायच्या. भारतातील ग्रामीण भागात इलेक्ट्रिक कार्गो सायकल वापरात आल्याचं आजवर कोणी पाहिलेलं नाही. (CESL New Scheme Cargo E Bikes will reach to villages read more about)

Cargo E-Bikes
World Bicycle Day: असाही एक देश जिथं पंतप्रधान जातात सायकलीवरून संसदेत

फायनान्शिअल एक्सप्रेसशी बोलताना, CESL चे नवनियुक्त सीईओ विशाल कपूर म्हणाले की, आम्ही काही ग्रामीण-केंद्रित संस्थांसोबत जवळून काम करतोय आणि तेव्हाच आम्हाला अशा उत्पादनाची मागणी लक्षात आली.

काही वर्षांपूर्वी, CESL ने इच्छुकांकडून 1 लाख इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनांच्या खरेदीसाठी निविदा काढली होती. याशिवाय याच वर्षी पन्नास हजार इलेक्ट्रिक टू व्हीलर्स जमा झाल्या ज्या भाडेतत्त्वावर देण्यात आल्या तर काही विकल्या. याशिवाय केरळ आणि गोव्यानंतर आता आंध्रप्रदेश सरकारला २५ हजार इलेक्ट्रिक टू व्हीलर्स देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Cargo E-Bikes
Sci-Tech : त्या 'कोका-कोला' फोनची आता भारतात विक्री सुरु; वैशिष्ट्ये अन् किंमत

सीईएसएलचे नवे सीईओ विशाल कपूर म्हणाले की, इलेक्ट्रिक कार्गो सायकल प्रकल्प अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. आम्ही आत्तापर्यंत काही गावांशी जोडलेलो आहोत आणि या उत्पादनाला मागणी असेल की नाही हे पाहण्याचा आमचा प्रयत्न आहे.

भारतात इलेक्ट्रिक कार्गो सायकलची किंमत ४० ते ५० हजार रुपये आहे. पण याची बाजारपेठ नेमकी किती आहे हे सांगणे कठीण आहे. कारण या विभागात अनेक अनऑर्गेनाइज्डकई सेक्टर मधील प्लेयर्स आहेत. हिरो लेक्‍ट्रो ब्रँडसह हिरो सायकल या सेगमेंटमधील एक लोकप्रिय ब्रँड आहे.

Cargo E-Bikes
Zen Technologies च्या शेअर्सचा उच्चांक, एका महिन्यात 35% रिटर्न...

या इलेक्ट्रिक सायकल्स पेडल असिस्टसह येतात आणि पूर्ण चार्जवर पेडल न मारता ३० किलोमीटरपर्यंत धावू शकतात. असे वाहन चालवण्याची किंमत प्रति किमी ०.२ पैसे आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी कोणत्याही नोंदणी किंवा वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()